घरदेश-विदेशगैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या बिझनेसमन गौतम थापरला ED कडून अटक

गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या बिझनेसमन गौतम थापरला ED कडून अटक

Subscribe

मनी लाँडरिंग प्रकरणात बिझनेसमन आणि अवंथा समूहाचे गौतम थापर यांना मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. मनी लाँडरिंग प्रकरणी तपास यंत्रणेने अलीकडेच दिल्ली आणि मुंबईतील अवंथा ग्रुप आणि थापरसह अनेक वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या जागेवर छापे टाकले होते. यानंतर थापरचीही चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थापर यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. न्यायालयात ईडी थापर यांची कोठडी मागणार असल्याचीही चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थापर यांच्यावर बँक निधीचा गैरव्यवहार, संबंधित पक्षांशी फसवणुकीचे व्यवहार, बँकांकडून चुकीच्या मार्गाने कर्ज घेणे, बनावट व्हाउचर आणि आर्थिक तपशील देणे, गुन्हेगारी षड्यंत्र आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणा या प्रकरणांमध्ये थापर यांची चौकशी करत आहे. थापर यांच्यावरील हे आरोप फॉरेन्सिक ऑडिट अहवालावर आधारित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

असे सांगितले जातेय की, ईडीने गौतम थापर आणि त्याच्या फर्म आणि सहकाऱ्यांविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी एक म्हणजे येस बँकेमध्ये ४६७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आहे. येस बँकेचे माजी कार्यकारी संचालक राणा कपूर यांनी खूप कमी किंमतीत मालमत्तेच्या स्वरूपात अवंथा रिअॅलिटीकडून लाच घेतली होती, असे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले होते. राणा कपूर यांनी ही लाच घेतल्याचा आरोप असून थापर यांच्या कंपनीला येस बँकेकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ मिळू शकेल. या मालमत्तेचे मार्केट व्हॅल्यू ६८५ कोटी रुपये आहे. यासह एसबीआयच्या तक्रारीवरून थापर यांच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसबीआयच्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने सीजी पॉवर आणि इंडस्ट्रियल सोल्यूशन लिमिटेड, त्याचे व्यवस्थापकीय संचालक गौतम थापर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात २४३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.


Antilia Bomb Scare: मनसुख हिरेनच्या हत्येसाठी ४५ लाखांची सुपारी; NIA चा दावा
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -