घरताज्या घडामोडीIndigo Flight : इंडिगो विमानात दिव्यांग मुलाला प्रवास करण्यापासून रोखलं, विमान मंत्री...

Indigo Flight : इंडिगो विमानात दिव्यांग मुलाला प्रवास करण्यापासून रोखलं, विमान मंत्री सिंधियानी दिले चौकशीचे आदेश

Subscribe

केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी इंडिगो विमान कंपनीवर नाराजी व्यक्त केली आहे. अपंग मुलाला इंडिगो विमानात प्रवास करण्यापासून रोखण्यात आले असल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाची दखल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली असून यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून स्वतः या प्रकरणात लक्ष देणार असल्याचे मंत्री सिंधिया यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अशा प्रकारची वागणूक सहन केली जाणार नाही असे म्हटलं आहे. अपंग मुलाला रांचीवरुन विमान प्रवास करण्यापासून इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी रोखलं आहे. या प्रकरणाबाबत सोशल मीडियावरसुद्धा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ट्विट केलं आहे की, अशा प्रकारची वागणूक सहन केली जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकाराला सामोरे जाण्याची परिस्थिती येऊ नये. यामुळे या प्रकरणाची चौकशी माझ्या निगराणीखाली करण्यात येईल असे मंत्री सिंधिया याांनी सांगितले आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

- Advertisement -

दरम्यान डीजीसीएनेसुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. डीसीजीएने स्वतः या प्रकरणावर सविस्तर अहवाल देण्यासाठी इंडिगो एयरलाइन कंपनीला सांगितले आहे. अपंग मुलाला विमान प्रवास करण्यापासून रोखण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी विमान कंपनीविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

इंडिगोकडून प्रकरणावर स्पष्टीकरण

इंडिगो कंपनीकडून घडल्या प्रकरावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. विमानातील इतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव अपंग मुलाला आपल्या पालकांसोबत ७ मे रोजी प्रवास करता आला नाही. विमानात चढण्यापूर्वी मुलगा प्रचंड घाबरला होता. ग्राऊंड स्टाफने मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि शांत होईपर्यंत वाट पाहिली. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही असे इंडिगोने म्हटलं आहे.


हेही वाचा : Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! केंद्राकडून नियमात मोठे बदल, जाणून घ्या

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -