घरदेश-विदेशBharatratna : कर्पुरी ठाकूर यांच्यासह चौघांना 'भारतरत्न' प्रदान; आडवाणी यांना घरी जाऊन...

Bharatratna : कर्पुरी ठाकूर यांच्यासह चौघांना ‘भारतरत्न’ प्रदान; आडवाणी यांना घरी जाऊन देणार पुरस्कार

Subscribe

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंग, कर्पुरी ठाकूर, हरित क्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामीनाथन यांना शनिवारी सकाळी मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. माजी उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्यांचे वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रपती मुर्मू रविवारी घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करतील. ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

आतापर्यंत 53 जण सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

केंद्र सरकारने यंदा पाचजणांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून 53 जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. यापूर्वी मदन मोहन मालवीय, अटल बिहारी वाजपेयी, प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Electoral Bond : मतदानापर्यंत ही गोष्ट कुणीही विसरू नये, अन्यथा…, रोहित पवारांनी मतदारांना केले अलर्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारी रोजी लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली होती. अटल बिहारी वाजपेयी आणि नानाजी देशमुख यांच्यानंतर लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले तिसरे नेते आहेत. लालकृष्ण आडवाणी हे 96 वर्षांचे आहेत आणि त्यांची तब्येत देखील बरी नसते. त्यामुळे 31 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वतः आडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार देणार आहेत.

- Advertisement -

चौधरी चरण सिंह हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ते ओळखले जातात. पीव्ही नरसिंह राव हे देशाचे नववे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात उदारीकरणाचे धोरण राबवण्यात आले. त्यामुळे त्यांना नवीन युगाचे प्रवर्तक मानले जाते. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना जननायक म्हणून ओळखले जाते. साधी राहणी, उच्च विचारसरणी यामुळे ते ओळखले जातात. प्रख्यात कृषीशास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. भारतीय कृषी आणि शेतकरी कल्याणातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा – Thackeray group : मोदी प्रेरणेने सुरू झालेला खेळ, वकिलांच्या पत्रावरून ठाकरे गटाची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -