Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश योगी सरकारची दिवाळी 'गिनीज' बुकात!

योगी सरकारची दिवाळी ‘गिनीज’ बुकात!

Subscribe

अयोध्येमध्ये लवकरच प्रभू श्रीराम यांच्या नावाने विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी रामनगरी अयोध्यमध्ये खास पद्धतीने दिवाळी साजरी केली. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत जवळपास ३ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलीत करत, अयोध्येत अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी क्षिण कोरियाच्या ‘फर्स्ट लेडी’ किम जुंग सूक यादेखील उपस्थित होत्या. मंगळवारी संध्याकाळी शरयू नदीच्या काठावर सुमारे ३ लाख १ हजार १५२ दिव्यांची नेत्रदीपक आरास करण्यात आली होती. थेट ‘गिनीज’ बुकमध्ये याची नोंद करण्यात आली आहे. याच दीपोत्सवाच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली. ‘फैजाबाद’ जिल्ह्याचे नाव बदलून त्याला ‘अयोध्या’ हे नवीन नाव दिले गेले. कार्यक्रमादरम्यान शरयू नदीच्या तिरावर महाआरती केली गेली. याशिवाय खास लेझर शोचं देखील त्याठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. या नयनरम्य सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


या कार्यक्रमादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी अन्य काही महत्वाच्या घोषणा केल्या. ‘राजा दशरथ यांच्या नावावर एक मेडिकल रुग्णालय लवकरच उघडण्यात येणार आहे’, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. तसंच अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या नावाने विमानतळाची निर्मिती करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


वाचा: योगी सरकारनं झकाना स्टेडियमचं नाव बदललं

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -