घरदेश-विदेशअयोध्येत ६ लाख दिवे लावून दीपोत्सव साजरा;‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद!

अयोध्येत ६ लाख दिवे लावून दीपोत्सव साजरा;‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद!

Subscribe

यावेळी ६ लाख ६ हजार ५६९ मातीच्या पणत्या लावण्यात आल्या.

अयोध्येत शुक्रवारी भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तब्बल ६ लाखांहून अधिक दिवे लावून योगी सरकारने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. योगी सरकारने केलेल्या वक्तव्यामध्ये असे म्हटले होते की, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ च्या प्रतिनिधींनी अयोध्येतील हा भव्य स्वरूपातील दीपोस्तव पाहिला. यावेळी ६ लाख ६ हजार ५६९ मातीच्या पणत्या लावण्यात आल्या. अशाप्रकारचा भव्य दीपोत्सव अयोध्येत साजरा होत असल्याने अयोध्याने रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदविले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम भक्त आणि सर्व अयोध्यावासियांनी हा विक्रम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते असेही म्हणाले की, पुढील वर्षी हा विक्रमही तोडला जाईल आणि पुढच्यावर्षी ७ लाख दिवे अयोद्धेत लावले जातील. ते म्हणाले, “प्रदूषणमुक्त दीपावली कशी साजरी केली जाऊ शकते, हे देखील यातून दिसून येते. यासाठी अयोध्यावासीयांचेही अभिनंदन केले पाहिजे.सामूहिक सहभाग कोणत्याही उत्सवाला अधिक आनंदित करतो. संपूर्ण जगाचे लक्ष त्याच्याकडे जाते.”

- Advertisement -

शुक्रवारी उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अयोध्येत शरयू नदीच्या किनाऱ्यावर भव्य दीपमहोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याखेरीज राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी शरयू नदीची आरती केली. दरम्यान दीपोत्सवात हजेरी लावण्यासाठी अयोध्येत आगमन झालेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथम श्री राम जन्मभूमी मंदिरात गेले आणि रामलल्लाचे दर्शन घेतले. श्री रामजन्मभूमी तीर्थ परिसरातील अनेक विश्वस्त या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी श्री राम यांच्या स्वरूपाचा राज्याभिषेकही केला.


‘जुनी थडगी काढू नका, तुमचेच सांगाडे सापडतील’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -