घरदेश-विदेशAyodhya : अयोध्येसाठी आता मुंबईसह 'या' सात शहरातून थेट विमानसेवा

Ayodhya : अयोध्येसाठी आता मुंबईसह ‘या’ सात शहरातून थेट विमानसेवा

Subscribe

नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशभरातून आणि जगभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उत्तर प्रदेशातील अयोध्येला पोहोचत आहेत. भाविकांच्या आणि व्यावसायिकांच्या सेवेसाठी केंद्रीय नागरीक उड्डाण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2024 पासून 8 शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. ही उड्डाणे अयोध्येला थेट दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, मुंबई आणि बेंगळुरूशी जोडतील. स्पाईस जेट 1 फेब्रुवारीपासून अयोध्येसाठी ही उड्डाणे सुरू करत आहे. (Ayodhya Direct flights to Ayodhya now from seven cities including Mumbai)

हेही वाचा – Rahul Gandhi : दबाव निर्माण होताच यू-टर्न घेतला, पण…; राहुल गांधींचा नितीश कुमार यांना मिश्कील टोला

- Advertisement -

यासाठी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या नवीन मार्गांना नागरी विमान वाहतूक विभागाने मान्यता दिली आहे. बुधवार वगळता दररोज दिल्ली-अयोध्येसाठी उड्डाणे असतील असे सांगण्यात येत आहे. तसेच गुरुवार वगळता दररोज अयोध्येहून अहमदाबादसाठी उड्डाणे असतील. चेन्नई-अयोध्या ते मुंबई-अयोध्या दरम्यान दररोज उड्डाणे होईल. दरभंगा-अयोध्या, पाटणा-अयोध्या आणि जयपूर-अयोध्यासाठी विमानाचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच विमानसेवा सुरू झाली होती. आतापर्यंत फक्त साप्ताहिक उड्डाणे होत होती. मात्र आता दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर दररोज विमानसेवा सुरू झाल्याने देशभरातून येणाऱ्या भाविकांना आता दिलासा मिळणार आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. यामध्ये परराज्यातून आणि परदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Bhushan : अशोक सराफांसोबत काम करण्याचे माझे भाग्य; भुजबळांनी सांगितला किस्सा

विमानाचे असे असेल वेळापत्रक

उड्डाणे – प्रस्थान – आगमन – दिवस

 1. दिल्ली ते अयोध्या – 10.40 – 12.00 दररोज (बुधवार वगळता)
 2. अयोध्या ते दिल्ली – 08.40 – 10.00 दररोज (बुधवार वगळता)
 3. चेन्नई ते अयोध्या – 12.40 – 15.15 दररोज
 4. अयोध्या ते चेन्नई – 16.00 – 19.20 दररोज
 5. अहमदाबाद ते अयोध्या – 06.00- 08.00 दररोज (बुधवार वगळता)
 6. अयोध्या ते अहमदाबाद – 12.30- 14.25 दररोज (बुधवार वगळता)
 7. जयपूर ते अयोध्या – 7.30 – 9.15 आठवड्यातून चार दिवस
 8. अयोध्या ते जयपूर – 15.45 – 17.30 आठवड्यातून चार दिवस
 9. पाटणा ते अयोध्या – 14.25 – 15.25 आठवड्यातून चार दिवस
 10. अयोध्या ते पाटणा – 13.00 – 14.00 आठवड्यातून चार दिवस
 11. दरभंगा ते अयोध्या – 11.20 – 12.30 आठवड्यातून चार दिवस
 12. अयोध्या ते दरभंगा – 9.40 – 10.50 आठवड्यातून चार दिवस
 13. मुंबई ते अयोध्या – 8.20 – 10.40 दररोज
 14. अयोध्या ते मुंबई – 11.15 – 13.20 दररोज
 15. बेंगळुरू ते अयोध्या – 10.50 – 13.30 आठवड्यातून चार दिवस
 16. अयोध्या ते बेंगळुरू – 14.10 – 16.45 आठवड्यातून चार दिवस
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -