घरताज्या घडामोडीAyodhya : राम मंदिराच्या रचनेत बदल, नागर शैलीत असणार नवे डिझाईन

Ayodhya : राम मंदिराच्या रचनेत बदल, नागर शैलीत असणार नवे डिझाईन

Subscribe

राम मंदिराच्या रचनेत बदल करण्यात येणार असून हे मंदिर नागर शैलीच्या रचनेत बनवले जाणार आहे.

अयोध्येतील बहुप्रतिक्षीत राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) भूमीपूजनाची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ५ ऑगस्टला मंदिराच्या भूमीपूजनासाठी जाणार आहेत. दरम्यान, राम मंदिराच्या रचनेत बदल करण्यात येणार असून हे मंदिर नागर शैलीच्या रचनेत बनवले जाणार आहे. या मंदिराला मोठे घुमट असणार असून तीन इतर छोटे घुमट असणार आहे.

अशी असणार मंदिराची रचना

मिळालेल्या माहितीनुसार; पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराची डिजिटल स्वरुपात रचना पाहणार आहेत. त्यानंतर या मंदिराची प्रतिकृती सर्वांना पाहता येणार आहे. मंदिराच्या विषयी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधल्या जातील. मंदिराला एकूण पाच कळस आणि पाच प्रवेशद्वार असणार असतील. मंदिराचा दरवाजा संगमरवर दगडाचा असेल. तर भूमीपूजनासाठी गंगा, यमुना आणि सरस्वतीचा त्रिवेणी संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणली जाणार आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे १७ भाग असणार आहेत. यामध्ये मंदिराचे घुमट, गर्भगृह, कलश गोपुरम रथ, मंडप, पृथ्वी मंडप, परिक्रमा तोरणा, प्रदक्षिणा अधिष्ठाना असणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, भावनगरमधील तलगाजरडामध्ये डिजिटलच्या माध्यमातून मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केले आहे. यावेळी व्यासपीठावरुन राम मंदिर बांधण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. सर्वात आधी रामजन्मभूमीसाठी पाच कोटी पाठविले जातील, जे भगवान श्री राम यांच्या चरणी तुळशीपत्र म्हणून भेट दिली जाईल, असे मोरारी बापू यांनी सांगितले.


हेही वाचा – एक सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी तोपर्यंत नोकरी भरतीला स्थगिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -