घरदेश-विदेशAyodhya Ram Mandir: भूमीपूजनापूर्वी 'रामलल्ला' झाले अब्जाधीश!

Ayodhya Ram Mandir: भूमीपूजनापूर्वी ‘रामलल्ला’ झाले अब्जाधीश!

Subscribe

रामाच्या खात्यात भाविकांकडून सातत्याने येणाऱ्या देणग्यांमुळे ते आता अब्जाधीश झाले आहेत. यासह आजही देणगीदारांची संख्या लाखोंमध्ये आहे.

अखेर ज्या क्षणांची लाखो रामभक्त, भाविक वाट पाहात होते, तो क्षण आज पार पडला. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले. मात्र यापूर्वीच रामलल्ला अर्थात श्री राम अब्जाधीश झाले आहेत. देशासह जगभरातून लाखो राम भक्त, भाविक ट्रस्टच्या बँक खात्यात देणगी रक्कम जमा करत असतात. अयोध्येच्या भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, रामाच्या खात्यात भाविकांकडून सातत्याने येणाऱ्या देणग्यांमुळे ते आता अब्जाधीश झाले आहेत. यासह आजही देणगीदारांची संख्या लाखोंमध्ये आहे.

तारीख जाहीर होण्यापूर्वी खात्यात २० कोटी जमा

मिळालेल्या माहितीनुसार, श्री रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना फेब्रुवारी महिन्यात झाल्यानंतर एसबीआय बॅंकेत मंदिर बांधण्यासाठी खाते उघडण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अशा परिस्थितीतही भाविकांनी दान म्हणून साडेचार कोटी रुपये जमा केले. दरम्यान, राम मंदिर भूमीपूजनाची तारीख निश्चित झाली तेव्हा ती देणगी आणखी वाढली. ही तारीख जाहीर होण्यापूर्वी रामललाच्या खात्यात २० कोटी रुपये जमा असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

भारतातील भाविकांनी ११ कोटींची देणगी दिली

यादरम्यान अनेक भाविकांनी कोट्यावधी दान केले आहे. याबाबत माहिती देताना ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, रामकथा वाचक संत मुरारी बापूंच्या आवाहनावरून त्यांच्या अनुयायांनी चार दिवसांत १८ कोटींची रक्कम देणगी स्वरूपात जमा केली आहे. तर मंगळवारी रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात भारतात राहणाऱ्या भाविकांनी ११ कोटींची देणगी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.


Ayodhya Ram Mandir Model: असं असणार अयोध्येतील भव्य ऐतिहासिक राम मंदिर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -