घरक्राइमRam Mandir : VIP दर्शनाच्या नावाखाली रामभक्तांची लूटमार; ट्रस्टकडून धक्कादायक प्रकाराचा खुलासा

Ram Mandir : VIP दर्शनाच्या नावाखाली रामभक्तांची लूटमार; ट्रस्टकडून धक्कादायक प्रकाराचा खुलासा

Subscribe

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्धाटन झाले. या राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर सर्व देशभरातील रामभक्तांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले. काल (22 मार्च) या मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला दोन महिने पूर्ण झाले.

अयोध्या : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्धाटन झाले. या राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर सर्व देशभरातील रामभक्तांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले. काल (22 मार्च) या मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला दोन महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यांत विक्रमी संख्येने भाविक आल्याची नोंद झाली आहे. परंतु, एकिकडे अवघ्या भारताचे श्रद्धास्थान असलेल्या रामाची भाविकांकडून मोठ्या मनोभावाने पूजा अर्चना केली जाते तर, दुसरीकडे याच भक्तांची फसवणूकही केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम मंदिराच्या विश्वस्त मंडळानेच याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (ayodhya ram mandir trust reveals devotees looted on the vip darshan)

कशी सुरू होती भक्तांची लूटमार?

अयोध्येतील राम मंदिर देशभरातील भाविकांसाठी खुलं झालं आहे. दररोज लाखोंच्या संख्येने भाविक राम मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. याच गर्दीचा फायदा घेत काही समाजकंटकांनी रामलल्लाच्या दर्शनाचा बाजार मांडला होता. विदेशी पर्यटकाला VIP आणि सुगम दर्शनाचं आमिष दाखवत दोन हजार रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर संबंधितांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेशच्या एका पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश असून, पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे.

- Advertisement -

रामभक्तांची होत असलेल्या लुटमारीबाबत स्वत: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी माहिती दिली. त्यानुसार, दर्शनाकरता आलेल्या एका विदेशी पर्यटकाला VIP आणि सुगम दर्शनाचं आमिष दाखवत दोन हजार रुपयांना फसवले. याप्रकरणी एसएसपी राज करण नैय्यर यांनी भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या उपेंद्रनाथ या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर राम मंदिर ट्रस्टकडून दर्शनासंबंधित भाविकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारालं जात नाही. तसंच येणाऱ्या भाविकांनी दर्शनासाठी कोणत्याही प्रकारे शुल्क देऊन भुलथापांना बळी पडू नये, असं आवाहन राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या वतीने करण्यात आलं आहे.

- Advertisement -

तसेच, भाविकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, भारतीय संस्कृतीत कोणत्याही देवदेवतेच्या दर्शनाकरीता पैसे देण्याची परंपरा नाही. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेनंतर दरदिवसाला लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची फसवणूक केली जात असे. हे सत्य अखेर उघडकीस आल्यानंतर मंदिर प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या सगळ्या प्रकाराचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सहजपणे आणि निशुल्क दर्शन उपलब्ध आहे. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – MOSCOW ATTACK : मॉस्कोत दहशतवादी हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी; ISISनं स्वीकारली जबाबदारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -