घरदेश-विदेशAyodhya Ram Mandir: भूमीपूजनाचा शुभ मुहूर्त केवळ ३२ सेकंदाचा! जाणून घ्या, विशेष...

Ayodhya Ram Mandir: भूमीपूजनाचा शुभ मुहूर्त केवळ ३२ सेकंदाचा! जाणून घ्या, विशेष कारण…

Subscribe

हा भूमीपूजनचा सोहळा विशेष मुहूर्तामध्ये संपन्न करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ परिसराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११.४० नंतर पुढील ३२ सेकंद अत्यंत शुभ आहेत

अयोध्येत आज राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी संपूर्ण अयोध्या सज्ज झाली असून पूजेची सर्व तयारी पूर्ण झाली आहेत. भूमीपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय साधारण १७० मान्यवर भूमीपूजनमध्ये सहभागी होणार आहेत. हा भूमीपूजनचा सोहळा विशेष मुहूर्तामध्ये संपन्न करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ परिसराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११.४० नंतर पुढील ३२ सेकंद अत्यंत शुभ आहेत. या शुभ मुहूर्तामध्ये भूमीपूजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या भूमीपूजनांविषयी महंत गिरी महाराज यांनी असे सांगितले की, ५ ऑगस्ट रोजी श्री राम मंदिर पायाभरणीचा शुभ मुहूर्त सकाळी ११. ४० असून श्री राम मंदिराच्या पायाभरणीसाठी त्यांना दोन शुभ मुहूर्त देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिलेल्या दोन शुभ वेळेचा अतिशय चांगला उपयोग केला आहे. २९ जुलै रोजी राफेल भारतात दाखल झाले आणि आता ५ ऑगस्टला राम मंदिराची पायाभरणी होणार आहे.

या ३२ सेंकदाच्या शुभ काळाविषयी महंत म्हणाले की, प्रत्येक शुभ मुहूर्ताचे १६ भाग असतात आणि या १६ भागांपैकी १५ भाग अत्यंत शुद्ध असतात, ज्यामधील ३२ सेकंद असे आहेत की या वेळात श्री राम मंदिराची पायाभरणी केली जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी असे म्हटले आहे की, या मंदिराची केवळ पुनर्बांधणी नाही तर देशाच्या चैतनेची पुनर्स्थापना आहे. तसेच शतकानुशतके परदेशी लोकांनी आमच्या देशात आक्रमण केले आहे, त्या हल्ल्यांचा जोरदार वेगानेच हा शुभारंभ सुरू आहे. दरम्यान स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्यावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या कोषाध्यक्षांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.


Ayodhya Ram Mandir: ‘स्वप्न साकारतंय; ‘भावनात्मक आणि ऐतिहासिक’ क्षण’- आडवाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -