घरताज्या घडामोडीभारताकडे ४० वर्षांपूर्वीच कोरोनाचे रामबाण औषध? विश्वविद्यालयाचा दावा

भारताकडे ४० वर्षांपूर्वीच कोरोनाचे रामबाण औषध? विश्वविद्यालयाचा दावा

Subscribe

भारताकडे ४० वर्षांपूर्वीच कोरोनाचे रामबाण औषध तयार असल्याचा दावा विश्वविद्यालयाने केला असून या औषधाच्या चाचणीला आयुष मंत्रालयानी परवानगी दिली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. मात्र, अद्यापही यावर कोणतीही लस किंवा औषध आलेले नाही. अनेक देशांमध्ये या विषाणूवर लस शोधण्याचे काम सुरु असतानाच योग गुरु रामदेव बाब यांनी प्रतिकारशक्तीवरील औषध बनविण्याची परवानगी घेऊन कोरोनावर १०० टक्के मात करणारे औषध लॉंच केले. त्यांच्या या औषधामुळे देशात मोठी खळबळ उडाली. मोठ्या मोठ्या कंपन्यांना तीन चार प्रकारच्या ट्रायमधून जावे लागत असताना रामदेव बाबांनी मात्र, कोणतीही अधिकृत चाचणी न घेता थेट औषध लॉंच करत दावा केला. यामुळे आयुष मंत्रालयालाही ही बाब खटकली होती. त्यानंतर आता काशी विश्वविद्यालयाने मोठा दावा केला आहे.

काय केला दावा?

काशीच्या हिंदू विश्वविद्यालयाच्या आयुर्वेद विभागाने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे हे औषध ४० वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले होते, असे या विश्वविद्यालयाचे म्हणणे आहे. या दाव्यानुसार आयुष मंत्रालयाने बीएचयुच्या आयुर्वेद विभागाच्या दाव्यावर विश्वास ठेवून औषधाच्या चाचणीला परवानगी दिली आहे. चाचणीच्या तीन महिन्यानंतर बीएचयू आयुर्वेद विभाग अहवाल आयुष मंत्रालयाकडे सोपविणार आहे.

- Advertisement -

‘२२ मार्च रोजी आम्ही आयुष मंत्रालयाला पत्र लिहिले होते. १९८० मध्ये श्वसनरोगासाठी शोधलेल्या ‘शिरीषादि कसाय’या औषधाच्या चाचणीला मंजुरी मागितली होती. त्यानुसार आता आयुष मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या औषधाची चाचणी केली जाणार आहे. आयुष मंत्रालयाने यासाठी १० लाख रुपयांची मदतही देऊ केली आहे. बीएचयूच्या कोविड रुग्णालयामध्ये याची चाचणी केली जाणार आहे. कोरोनाचे आणि श्वसनरोगाचे सारखेच लक्षण आहे. त्यामुळे हे औषध कोरोनावर रामबाण उपाय ठरु शकते’. – डॉ. यामिनी भूषण त्रिपाठी; बीएचयु आयुर्वेद विभागाचे डीन

शिरीषादि कसाय औषधात हे घटक

बीएचयू आयुर्वेदचे माजी प्राध्यापक एस एन त्रिपाठी यांनी हे औषध शोधले होते. या औषधामध्ये लाजरी, अडुळसा, ज्येष्ठमध, तेजपत्ता आणि कंडकारीच्या रसापासून हे ‘शिरीषादि कसाय’ हे औषध बनविण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – LAC जवळ सैन्याने केला युद्धाचा अभ्यास


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -