घरCORONA UPDATE'आयुष्मान भारत'चे ऑफिस सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

‘आयुष्मान भारत’चे ऑफिस सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

Subscribe

कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे आता २५ कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

दिल्लीतील कोनॉट प्लेसच्या जीवन भारती इमारतीत स्थित आयुष्मान भारतचं कार्यालय सील करण्यात आलं आहे. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे आता २५ कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पाच दिवसांपूर्वी कार्यालय सील करण्यात आलं असून आता ते २४ एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे. आयुष्मान इंडियाचे सीईओ डॉ. इंदू भूषण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जलदगतीने होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्या वाढून १७,६५६ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाची १५४० नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि ४० लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत ५५९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तथापि या रोगाचा पराभव करण्यात २,८४२ रुग्णांना यश आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘डेकोय प्रोटीन’ कोरोना विषाणूला रोखणार?


देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत देशातील लॉकडाऊन कुलूप ३ मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. तथापि, २० एप्रिलपासून म्हणजेच आजपासून ज्या भागात कोरोनाची प्रकरणे कमी आहेत अशा भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -