Homeदेश-विदेशKazakhstan : रशियाला जाणाऱ्या विमानाचा अपघात; 40 हून अधिक जणांचा मृत्यू

Kazakhstan : रशियाला जाणाऱ्या विमानाचा अपघात; 40 हून अधिक जणांचा मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : कझाकस्तानच्या अकताऊ शहराजवळ एक विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 40 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 67 प्रवासी करत असून यामध्ये 20 हून अधिक प्रवासी वाचले असल्याची शक्यता आहे. कझाकस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात अकताऊ विमानतळाजवळ झाला. हे विमान अझरबैजान एअरलाइन्सचे होते. हे विमान रशियाच्या ग्रोझनी शहरात जात होते. ग्रोझनीमध्ये दाट धुक्यांमुळे त्याची दिशा वळवण्यास सांगण्यात आले. (Azerbaijan Airlines plane crashes near Kazakhstan’s Aktau)

हेही वाचा : Sanjay Raut : बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती, राऊतांनी व्यक्त केला संताप 

कझाकिस्तानच्या सरकारने निवेदन काढले, ज्यामध्ये म्हटले आहे की, “विमानाला आग लागल्याचे समोर आले. बचाव पथकांनी आग विझवण्यास सुरुवात केली. जीवितहानीबद्दलच्या तपशीलांची अद्याप पुष्टी केली जात आहे. पण प्राथमिक अहवालावरून असे दिसते की काही प्रवासी या अपघातामध्ये बचावले आहेत.” समोर आलेल्या माहितीनुसार, विमानामध्ये 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स होते. विमान अपघातानंतर समाज माध्यमांवर काही धक्कादायक चित्र समोर आली आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विमान कोसळताना दिसत आहे. या अपघाताबाबत अझरबैजान एअरलाइन्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

रशियातील माध्यमांनुसार, तांत्रिक समस्यांबाबतीत सध्या संभाव्य शक्यतांचा शोध सुरू आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार वैमानिकाने पक्ष्यांच्या धडकेनंतर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, रशियाच्या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याआधीही ब्राझीलमध्ये आणखी एक विमान अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान ग्रामाडो शहरामधील एका मोबाईल फोनच्या दुकानात पडले. या अपघातात 12 हून अधिक जण जखमी झाले होते.


Edited by Abhijeet Jadhav