घरCORONA UPDATEकोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी १ हजार १२५ कोटींची केली मदत!

कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी १ हजार १२५ कोटींची केली मदत!

Subscribe

कोरोना व्हायरस संकटाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींचा यांचा दानशूरपणा. ११२५ कोटींची मदत केली.

देशभरात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनेक जण या संकटाला तोंड देण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे. रिलायन्स, टाटानंतर आता आयटी कंपनी विप्रो आणि त्याचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी ११२५ कोटी रुपयांच्या मदत जाहीर केली आहे. ही मदत पीएम केअर्सऐवजी फाऊंडेशनच देणार आहे.

विप्रोकडून जारी केल्या निवेदनानुसार विप्रो लि., विप्रो इंटरप्रायजेस आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी एकत्रित येऊन ही मदत देऊ केली आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा हा अझीम प्रेमजी फाउंडेशनचा असणार आहे. विप्रो लि. १०० कोटी, विप्रो इंटरप्रायजेस २५ कोटी आणि फाउंडेशन १००० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. संसर्गजन्य परिसरातील लोकांसाठी आणि आरोग्य सुविधांवर हा निधी खर्च केला जाणार आहे. तसंच अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या १६०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

अझीम प्रेमजी यांनी ५० हजार कोटी रुपये निधी दिल्याचं वृत्त नुकतच व्हायरस होत होते. मात्र ते वृत्त चुकीचे आहे. हे वृत्त २०१९च्या एका मदती संबंधित असल्याच समोर आलं आहे.

कोरोना संकटाशी लढण्यासाठी याचे देखील मदतीचे हात पुढे सरसावले

  • लक्ष्मीनारायण मित्तल यांनी देखील पंतप्रधान केअर्समध्ये १०० कोटी रुपयांची मदत केली असून त्याच्या कंपन्या ५ हजार लोकांनी भोजनाची व्यवस्था देखील केली आहे.
  • जिंदल स्टीलने २५ कोटीचा निधा दिला आहे.
  • होंडा इंडिया फाऊंडेशनने ११ कोटी रुपयांची मदत केली आहे.
  • वर्धमान ग्रुपने पाच कोटी पंतप्रधान मदत निधीत दिले आहेत.

हेही वाचा –  CoronaVirus: पेन्शनच्या पैशातून ८२ वर्षांच्या आजीने दिली १ लाखाची मदत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -