बी. एस. येडियुरप्पा आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

B. S. Yeddyurappa
बी. एस. येडियुरप्पा आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. विशेष म्हणजे आज कर्नाटकमधील भाजप सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. दरम्यान, राजीनाम्याची माहिती येडियुरप्पा यांनी स्वत: दिली आहे. आज दुपारी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

कार्नाटकमध्ये गेले काही दिवस मुख्यमंत्रीपदावरुन नाराजी नाट्य सुरु होतं. तसंच, काही दिवसांपूर्वी येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते दुपारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेत राजीनामा देणार आहेत.

बी.एस. येडियुरप्पा यांनी प्रतिक्रिया देताना कर्नाटकातील जनतेसाठी अजून बरच काही करायचं आहे. आपण सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे, असं म्हणाले. त्यांना नेहमीच अग्नीपरीक्षेतून जावं लागलं, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकारची दोन वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करताना बी.एस. येडियुरप्पा सकाळपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमातही सहभागी होत होते.