बागेश्वर धामचे सर्वेसर्वा धीरेंद्र शास्त्री महाराज ( बागेश्वर बाबा ) यांनी हिंदू एकता यात्रा काढली आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशातील झांशी येथे पोहोचली आहे. यावेळी एकानं बागेश्वर बाबा यांना मोबाईल फेकून मारला. जो बागेश्वर बाबा यांच्या गालावर जाऊन लागला. यानंतर एकच खळबळ उडाली असून बागेश्वर बाबा आणि पोलिसांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
घडलं काय?
बागेश्वर बाबा यात्रेत आपल्या भक्तांसह पायी चालत होते. तेव्हाच ही घटना घडली आहे. पायी चालत असताना बागेश्वर बाबा भक्तांशी संवाद साधत होते. यावेळी कुणीतरी फुलांसह मोबाईलही फेकला. तो मोबाईल बागेश्वर बाबा यांच्या गालांवर येऊन लागला.
हेही वाचा : नरेश अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवल्यानं अमोल मिटकरी भडकले; म्हणाले, “हा महाराष्ट्र…”
“कुणीतरी मला मोबाईल फेकून मारला आहे,” असं यावेळी बाबांनी म्हटलं. “फुलांसह कुणीतरी मला मोबाईल फेकून मारला आहे. हा मोबाईल मला मिळाला आहे,” असं बागेश्वर बाबा म्हणाले.
#JhansiPolice
कतिपय सोशल मीडिया प्लेटफार्म पर जनपद झांसी में चल रही बाबा बागेश्वर धाम सरकार की पदयात्रा के दौरान हमले संबंधी भ्रामक तथ्यों के खंडन के संबंध में- pic.twitter.com/sccFsU30xi— Jhansi Police (@jhansipolice) November 26, 2024
पोलिसांनी काय म्हटलं?
बागेश्वर बाबांबर हल्ला केल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर झांशीच्या पोलिसांनी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. “धीरेंद्र शास्त्री सरकार यांच्यावर हल्ला झाला नाही. पुष्पवृष्टी करताना मोबाईल चुकून लागला आहे.”