घरताज्या घडामोडीअंबानी आणि अदानींपेक्षा माझा वेळ अधिक मौल्यवान, बाबा रामदेवांचं मोठं वक्तव्य

अंबानी आणि अदानींपेक्षा माझा वेळ अधिक मौल्यवान, बाबा रामदेवांचं मोठं वक्तव्य

Subscribe

अब्जाधीश उद्याोगपती मुकेश अंबांनी, रतन टाटा आणि गौतम अदांनी यांच्यापेक्षा माझा वेळ अधिक मौल्यवान आहे, असं योगगुरू बाबा रामदेव म्हणाले. त्यांनी आपल्या वेळेची तुलना थेट देशातील सर्वात मोठ-मोठ्या उद्योगपतींच्या वेळेशी केली.

कॉर्पोरेटमधील लोकं १९ टक्के स्वत:साठी वापरतात. तर योगसाधना करणाऱ्यांचा संताप वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी असतो. परंतु अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या अब्जाधीशांनी घालवलेल्या वेळेपेक्षा माझा तीन दिवसांचा मुक्काम केल्याचा वेळ हा अधिक मोलाचा आहे, असं रामदेव बाबा म्हणाले. रामदेव बाबा त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

- Advertisement -

मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी येथे आलो आहे. कॉर्पोरेटमधील लोक हे १९ टक्के वेळा हा स्वत;च्या फायद्यासाठी वापरतात, तर संतांचा वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी वापरला जातो. अकबर, बाबर किंवा औरंगजेब नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो आहेत, असंही बाबा रामदेव म्हणाले.

आम्हाला बहुतांश राज्य बोर्ड किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये चुकीचा इतिहास शिकवला गेला आहे. या पुस्तकांमध्ये मुघलांचा गौरव करण्यात आला आहे. हे बदलायला हवं. अकबर, बाबर किंवा औरंगजेब हे आमचे नायक नाहीत. तर आपले महान वीर छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि इतर देशासाठी बलिदान देणार आहेत, असं बाबा रामदेव म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : महेश आहेरांच्या निलंबनासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक, महिलांची ठामपा मुख्यालयावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -