रामदेव बाबांच्या ‘कोरोनिल’ चं नेटकऱ्यांनी जोडलं थेट बॉलिवूडशी कनेक्शन!

अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने कोरोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा मंगळवारी केला. रामदेवबाबा यांनी हरिद्वारमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘कोरोनील’ आणि ‘श्वसरी’ औषधांची कोरोनाबाधित रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचे आणि ही औषधे १०० टक्के परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला. या औषधांमुळे केवळ सात दिवसांत करोना पूर्णपणे बरा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यानंतर सोशल मीडियावर फक्त याचीच चर्चा रंगली. ट्विटरवर #Coronil ट्रेण्डींगमध्ये होतं. अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी थेट बॉलिवूडच्या चित्रपटांशी कोरोनीलचा संबंध जोडला.


हे ही वाचा – पतंजलीने लाँच केले करोनावर औषध