घरदेश-विदेश‘पतंजली’ मालामाल! ‘कोरोनिल’ विक्रीतून ४ महिन्यात कमावले २४१ कोटी

‘पतंजली’ मालामाल! ‘कोरोनिल’ विक्रीतून ४ महिन्यात कमावले २४१ कोटी

Subscribe

कोरोना काळात देशभरात कोरोनाचा संसर्ग सुरू असताना योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ने केवळ चार महिन्यांत ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले

देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू आहे. दरम्यान कोरोना काळात देशभरात कोरोनाचा संसर्ग सुरू असताना योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ने केवळ चार महिन्यांत ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले असल्याची माहिती मिळतेय. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार ४ महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून अंदाजे २४१ कोटी कमवले असल्याचे सांगितले जात आहे.

द प्रिंटने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोरोनाचा फैलाव वेगवान होत असताना कोरोनावरील परिणामकारक आयुर्वेदिक औषध म्हणून कोरोनिलचा प्रचार-प्रसार करण्यात आला होता.

- Advertisement -

कंपनीने कोरोनिलची निर्मिती करण्याआधी सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्याचा परवाना सरकारकडून घेतला होता. दरम्यान रामदेव बाबा आणि ‘पतांजली’चे आचार्य बालकृष्ण यांनी २३ जूनला या औषधाची घोषणा केली असून हे औषध कोरोनावर प्रभावी आहे की नाही यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. कोरोनावर प्रभावी ठरणारे औषध असा दावा केल्यामुळे हे औषध काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने असाही दावा केला होता की, हे औषध ‘पतंजली’च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असेल असे सांगितले होते. ऑनलाइन माध्यमातूनही हे औषध मागवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जाईल असा दावा कंपनीने केला होता. या औषधाची किंमत ५४५ रुपये ठेवण्यात आली होती.


१२ आमदारांची नावे ठरली पवार, ठाकरेंकडे ते गुपित
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -