घरताज्या घडामोडीमहिलेच्या गर्भाशयात नाही तर लिव्हरमध्ये वाढतयं भ्रूण, डॉक्टरही चक्रावले

महिलेच्या गर्भाशयात नाही तर लिव्हरमध्ये वाढतयं भ्रूण, डॉक्टरही चक्रावले

Subscribe

वैद्यकिय विश्वाला हादरा देणारी अनाकलनिय घटना कॅनडात घडल्याचे समोर आले आहे. येथे एका महिलेला दिवस गेले पण बाळ तिच्या गर्भाशयात नाही तर चक्क लिव्हरमध्ये वाढतं असल्याचे समोर आले. महिलेला सतत रक्तस्त्राव होत असल्याने ती डॉक्टरांकडे गेली. त्यावेळी तपासणीत हा दुर्मिळ प्रकार समोर आला. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा या केससंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जगभऱातील डॉक्टर यावर आश्चर्य़ व्यक्त करत आहेत.

कॅनडातील मैनिटोबा येथील एका रुग्णालयात ही घटना समोर आली. ‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार येथील डॉक्टर मायकल नार्वे .यांनी हा खुलासा केला आहे. या ३३ वर्षीय महिलेला गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात दोन आठवडे सलग रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीमध्ये तिच्या गर्भाशयात नाही तर लिव्हरमध्ये भ्रूण वाढत असल्याचे समोर आले. ही गोष्ट डॉक्टरांसाठी अविश्वसनीय होती. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना विश्वासात घेतले. महिलेचा जीव वाचवणे शक्य आहे पण तिच्या लिव्हरमध्ये वाढत असलेल्या भ्रूण वाचवणे अशक्य असल्याचे नातेवाईकांना सांगितले. भ्रूण गर्भाशयात नसून लिव्हरमध्ये असल्यानेच तिला रक्तस्त्राव होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

विशेष म्हणजे डॉक्टरांनी याचे कारणही अजब असल्याचे म्हटले. शरीरसंबंधांवेळी वीर्य तिच्या लिव्हरमध्ये गेल्यानेच भ्रूण तिथेच वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

वैद्यकीय भाषेत अशा गर्भधारणेला एक्टोपिक प्रेग्नेंसी म्हणतात. एक्टोपिक प्रेग्नंसी ही फेलोपिन ट्यूब चुकीच्या दिशने वळल्याने होऊ शकते. यामुळे गर्भधारणा सामान्यपणे न होता असामान्यपणे होते. संबंधित महिलेच्या बाबतीतही हीच घटना घडली आहे. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर नार्वेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -