पहिल्यांदाच आईस्क्रीम खातानाचा बाळाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओने धमाल उडवून टाकली आहे. नऊ महिन्याच्या एका बाळाचा हा व्हिडीओ असून ब्लॅकली असं तिचे नाव आहे. पहिल्यांदाच आईस्क्रीम खात असल्याने तिच्या चेहऱ्यावर उमटलेले मजेशीर हावभाव या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्ंयत चार लाख लोकांनी त्याला लाईक्स केले आहे.

ब्लॅकलीला तिच्या आई बाबांनी याआधी कधीही आईस्क्रीम दिले नव्हते. यामुळे पहिल्यांदा बास्कीन-रॉबीन्स आईस्क्रीमची चव चाखताना ब्लॅकलीच्या चेहऱ्यावर मजेशीर हावभाव उमटले होते. त्यानंतर तिने चक्क आईस्क्रीम हातातही पकडले. पण त्याचा थंडगार स्पर्श तिला नवीनच होता. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर भीति बरोबरच आश्चर्याचेही भाव एकत्र उमटले. हे पाहून तिच्या पालकांना मात्र भलताच आनंद झाला. हाच आनंदी क्षण तिच्या आईने कॅमेऱ्यात टिपला. नंतर तो टीक टॉक व्हिडीओ बघून तिने तो सोशल मीडियावर पोस्ट केला. याआधी आपण कधीही कुठलाही व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला नव्हता. पण यावेळी लेकीचे हावभाव बघून मन उल्हासित झाले आणि आपण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचे तिने म्हटले आहे. आतापर्यंत ४ लाख लोकांनी हा व्हिडीओ बघितला असून त्यावर गंमतीशीर कमेंट्स केले आहेत.

 

@mamabritti#cute #funny #waitforit #love♬ original sound – mamabritti