घरअर्थजगत१ एप्रिलपासून सोने खरेदीत होणार बदल, सरकराने जारी केले नवे नियम

१ एप्रिलपासून सोने खरेदीत होणार बदल, सरकराने जारी केले नवे नियम

Subscribe

New Rule For Sale of Gold Jewelry | चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे ग्राहक व्यवहार विभागाने सांगितले. त्यानुसार, १ एप्रिलपासून सोन्यावर सहा अंकी हॉलमार्क असलेलेच दागिने सराफा विकू शकणार आहे. 

New Rule For Sale of Gold Jewelry | नवी दिल्ली – सोन्याच्या दागिन्यांची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 31 मार्च 2023 नंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (Hallmarking Unique Identification) असलेलेच सोन्याचे दागिने (Gold Jewelry) आणि सोन्याच्या कलाकृती (Gold Artefacts) विकता येणार आहेत, असा निर्णय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने घेतला आहे. चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे ग्राहक व्यवहार विभागाने सांगितले. त्यानुसार, १ एप्रिलपासून सोन्यावर सहा अंकी हॉलमार्क असलेलेच दागिने सराफा विकू शकणार आहे. त्यामुळे येत्या गुढीपाडव्यादिवशी सोने खरेदी करताना सहा अंकी हॉलमार्किंग असलेलेच दागिने प्राधान्याने खरेदी करा. जेणेकरून १ एप्रिलनंतर त्या दागिन्यांची वैधता कायम राहिल.

1 एप्रिल 2023 पासून हा नवा नियम लागू होणार असून फक्त सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंगचेच दागिने वैध राहतील. या हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा ग्राहकांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. यासोबतच चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सरकारने शुक्रवारी सांगितले की 1 एप्रिलपासून सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीला सहा अंकी अल्फान्यूमेरिक HUID शिवाय परवानगी दिली जाणार नाही. सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी सरकारने दीड वर्षापूर्वीच प्रयत्न सुरू केले होते.

- Advertisement -


मंत्री पियुष गोयल यांनी BIS ची आढावा बैठक घेतली

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या नियमांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती. बैठकीत गोयल यांनी BIS ला देशात चाचणीसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले. BIS ला ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी वापरल्या जाणार्‍या घटकांच्या मागणीनुसार उत्पादन चाचणी आणि बाजार निरीक्षणाची वारंवारता वाढवण्यास सांगितले होते. बीआयएसने प्रयोगशाळा तपासणीची वारंवारताही वाढवावी, असे म्हटले आहे. BIS ला प्रेशर कुकर, हेल्मेट आणि इतर ग्राहक उत्पादने यांसारख्या उत्पादनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी बाजारपेठेतील देखरेख वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच, BIS ने आगामी काळात 663 उत्पादनांसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCO) प्रस्तावित केला आहे. सध्या 462 उत्पादने QCO अंतर्गत समाविष्ट आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

गोयल म्हणाले की, भारतातील सर्व उत्पादने सर्वोच्च गुणवत्ता आणि सुरक्षितता मानकांची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ते म्हणाले की, या उपाययोजनांमुळे मायक्रो-स्केल युनिट्सला चालना मिळेल, पायाभूत सुविधा वाढतील आणि नागरिकांमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादनांची जागरुकता निर्माण होईल.

मायक्रो स्केल युनिट्समध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी BIS विविध उत्पादन प्रमाणन योजनांसाठी प्रमाणीकरणावर 80 टक्के सवलत किंवा किमान मार्किंग शुल्क आकारेल असा निर्णय घेण्यात आला आहे. १६ जून २०२१ पासून सोन्याचे हॉलमार्किंग हे मौल्यवान धातूच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र मानले गेले आहे. त्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हे बंधनकारक करण्यात आले आणि दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्हे जोडण्यात आले, ज्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या 288 झाली. त्यात आणखी 51 जिल्हे जोडले जात आहेत.

1 एप्रिल 2023 पासून, HUID सह फक्त सोन्याचे दागिने विकण्याची परवानगी असेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी सांगितले की, ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयानुसार, हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने आणि HUID नसेलेल्या सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीला 31 मार्चनंतर परवानगी दिली जाणार नाही. ते म्हणाले की, सध्या चार अंकी तसेच सहा अंकी HUID वापरला जात आहे. दर्जेदार उत्पादनासाठी ग्राहकांच्या मागणीमुळे ते अनिवार्य नसलेल्या जिल्ह्यांमध्येही हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने देशभरात विकले जात आहेत.

HUID क्रमांक काय आहे?

ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीसाठी आधार कार्ड असते, त्याचप्रमाणे दागिन्यांच्या ओळखीसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक असतो. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक हा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. ज्यामध्ये अंक आणि अक्षरे असतात, जे ज्वेलर्सद्वारे नियुक्त केले जातात. या क्रमांकाच्या मदतीने दागिन्यांशी संबंधित प्रत्येक माहिती उपलब्ध होईल. दागिन्यांची शुद्धता, वजन आणि ते कोणी विकत घेतले याची माहिती या क्रमांकामुळे मिळू शकेल. एवढंच नव्हे तर ज्वेलर्सना ही माहिती BIS पोर्टलवर देखील अपलोड करावी लागणार आहे. Assaying and Hallmarking Center (AHC) मध्ये, प्रत्येक दागिन्यावर विशिष्ट क्रमांकाचा शिक्का मारला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -