घरदेश-विदेशअंडरवेअरमुळे सापडला कुख्यात दहशतवादी अबु बक्र अल बगदादी!

अंडरवेअरमुळे सापडला कुख्यात दहशतवादी अबु बक्र अल बगदादी!

Subscribe

कुख्यात दहशतवादी अबु बक्र अल बगदादी याचा खात्मा झाला असला, तरी त्याच्या अंडरवेअरमुळे तो सापडल्याचं आता समोर आलं आहे!

बातमीचं शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही. कदाचित ही अफवा वाटू शकते. कदाचित हे खोटं वृत्त वाटू शकतं. पण ही शंभर टक्के खरी बातमी आहे. दोन दिवसांपूर्वीच जगातला सर्वात धोकादायक वाँटेड दहशतवादी अबु बक्र अल बगदादी याचा सिरियाच्या वायव्य भागातल्या इदलिब या ठिकाणी खात्मा झाला. अमेरिकन सैन्याच्या पथकांनी शिताफीने कारवाई करत त्याच्या ठिकाणावर हल्ला चढवला होता. मात्र, फौजांच्या हाती लागण्याआधीच त्याने स्वत:ला बॉम्बस्फोटात उडवून दिलं. पण आता एक अजब आणि हास्यास्पद वाटणारी पण तितकीच महत्त्वाची बाब समोर आली आहे. बगदादीच्या अंडरवेअरमुळेच तो सापडल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

कोणत्याही देशाच्या गुप्तचर संस्था, सुरक्षा पथकं किंवा तपास यंत्रणा गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अनेक मार्गांचा वापर करत असतात. त्यासाठी त्यांना तंत्रज्ञानाची देखील मदत मिळते. बगदादीचा छडा लावण्यासाठी देखील सीरीयाच्या गुप्तचर यंत्रणेला याच तंत्रज्ञानाची मोठी मदत झाली. आणि त्यामुळेच त्याच्या अंडरवेअरमुळे त्याचा शोध घेणं तपास यंत्रणेला शक्य झालं!

कसा सापडला बगदादी?

वास्तविक ही कारवाई होण्याआधी १५ मेपासून सीरीयाच्या गुप्तचर विभागाने बगदादीवर पाळत ठेवणं सुरू केलं होतं. पण आपण मागावर आहोत तो हाच मोस्ट वाँटेड दहशतवादी अबु बक्र अल बगदादी आहे, याविषयी मात्र गुप्तचर विभागाची खात्री होत नव्हती. त्यात दहशतवाद्यांचा हा गट दर काही दिवसांनी आपला तळ हलवायचा. पण अखेर जेव्हा हा गट इदलिबमध्ये आला, तेव्हा गुप्तचरांना त्याच्या घराजवळ पोहोचण्यात यश मिळालं. पण बगदादी कसा ओळखायचा, याचं उत्तर त्याच्या अंडरवेअरमुळे गुप्तचरांना मिळालं. या गुप्तचरांनी कारवाईच्या २ दिवस आधी घराबाहेरून बगदादीची अंडरवेअर चोरून आणली होती. या अंडरवेअरवरून घेतलेल्या डीएनए नमुन्यांवरून तोच बगदादी असल्याची त्यांची खात्री पटली आणि पुढच्या दोनच दिवसांत अमेरिकी पथकांनी या तळावर हल्ला केला!

- Advertisement -

लष्करी श्वानाचीही महत्त्वाची भूमिका

दरम्यान, बगदादीच्या घरापर्यंत पोहोचण्यात अमेरिकेच्या एका लष्करी श्वानाचीही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. बेल्जियन मालिनोस जातीच्या या श्वानाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात देखील याच बेल्जियन मालिनोस जातीच्या श्वानांची मोठी मदत झाली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या श्वानाचं कौतुक करणारं ट्वीट केलं आहे.


हेही वाचा – ISISचा म्होरक्या अबु बक्र अल-बगदादी कसा मेला ते कळणार!

दरम्यान, बगदादीचा मृतदेह देखील ओसामा बिन लादेनप्रमाणेच समुद्रात सोडण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -