Assembly election 2022 : विधानसभा निवडणुकीतून मायावतींची एक्झिट, बीएसपीची घोषणा

बहुजन समाज पार्टीचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी माहिती दिली आहे की, बीएसपी सुप्रीमो मायावती आगामी विधानसभा निडणूक २०२२ लढवणार नाही.

Bahujan Samaj Party announced ma Mayawati Won't Contest Uttar pradesh Assembly Election 2022
Assembly election 2022 : विधानसभा निवडणुकीतून मायावतींची एक्झिट, बीएसपीची घोषणा

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा २०२२ च्या निवडणूकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चा आणि प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये बीएसपीच्या अध्यक्षा मायावतींचा सहभाग नव्हता. त्यावर बऱ्याच चर्चा सुरु होत्या. मात्र आता मायावती विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा बीएसपीकडून केली आहे. मायावतींच्या जागी बीएसपीचे राष्ट्रीय सचिव सतीश चंद्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बहुजन समाज पार्टीचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी माहिती दिली आहे की, बीएसपी सुप्रीमो मायावती आगामी विधानसभा निडणूक २०२२ लढवणार नाही. तसेच मी स्वतः आणि माझी पत्नी कल्पना मिश्रा, मुलगा कपिल मिश्रासुद्धा निवडणूक लढवणार नाही आहे. मायावतींचा पुतण्या आकाश आनंदसुद्धा निवडणुकीसाठी उमेदवारी देणार नसल्याचे सतीश चंद्र यांनी सांगितले.

सतीश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीचे सरकार येणार आहे. बीजेपी आणि समाजवादी पार्टी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षासाठी लढाई करत आहेत. निवडणुकी आधी आणि नंतर बीएसपी कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही.

उत्तर प्रदेशचे ब्राम्हण आमच्यासोबत –

मिश्रा

दरम्यान सतीश चंद्र मिश्रा पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशचे ब्राम्हणसुद्धा आमच्या सोबत आहेत. भाजपसोबत आणि समाजवादी पार्टीसोबत ब्राम्हण कधी जाणार नाहीत. भाजप सरकारमध्ये ब्राम्हण समाजाच्या ५०० लोकांच्या हत्या झाल्या आहेत. १०० पेक्षा जास्त एनकाउंटर करण्यात आले आहेत. ब्राम्हण समाजाने पाहिले आहे की, बीएसपीने कशाप्रकारे त्यांना मान मिळवून दिला आहे. ब्राम्हण असो किंवा अधिकाऱ्यांची गोष्ट असो. कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यामध्येही ब्राम्हणांना सन्मान दिला आहे.


हेही वाचा : आंतरजातीय विवाहासाठी मिळणार 2.50 लाख रुपयांची मदत; जाणून घ्या योजना आणि फायदे