Homeक्राइमAtul Subhash Suicide : निकिता सिंघानियासह माहेरच्यांना जामीन मंजूर; अतुल सुभाष आत्महत्या...

Atul Subhash Suicide : निकिता सिंघानियासह माहेरच्यांना जामीन मंजूर; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणातील आरोपी

Subscribe

बंगळूरूमध्ये अतुल सुभाष या 34 वर्षीय इंजिनिअरने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांची पत्नी निकिता आणि सासरच्या लोकांना शनिवारी बेंगळुरू न्यायालयाने जामीन मंजूर केला.

नवी दिल्ली : बंगळूरूमध्ये अतुल सुभाष या 34 वर्षीय इंजिनिअरने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांची पत्नी निकिता आणि सासरच्या लोकांना शनिवारी बेंगळुरू न्यायालयाने जामीन मंजूर केला. अतुल सुभाष यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या सर्वांवर होता. अतुल सुभाष यांनी 9 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. (bail granted to nikita singhania and other accused in atul shubhash suicide case)

बंगळूरूमध्ये एका 34 वर्षीय इंजिनिअरने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने आपला एक ते दीड तासांचा व्हिडीओ चित्रित केला. यामध्ये त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच, त्याने आत्महत्येपूर्वी तब्बल 24 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. अतुल सुभाष असे या 34 वर्षीय इंजिनिअरचे नाव असून सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सुभाषचा भाऊ बिकाश कुमारने दाखल केलेल्या तक्रारीवरून त्याची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया, भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – Yuzvendra Chahal Dhanashree Verma : चहलने इंस्टावरून काढले फोटो अन्…; पुन्हा एकदा घटस्फोटाची चर्चा

याच प्रकरणी अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात होते. जामीन मिळावा म्हणून त्यांनी बेंगळुरूतील सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींनी यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायलयात धाव घेत या प्रकरणातील याचिका निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सत्र न्यायालयाने आज ही याचिका निकाली काढली.

अतुल सुभाषवर त्यांच्या पत्नीने उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये हुंडा, हत्येचा प्रयत्न यासह 9 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता. पत्नीने घटस्फोटाचे प्रकरण निकाली काढण्यासाठी त्यांच्याकडे तब्बल 3 कोटींची मागणी केल्याचे देखील म्हटले होते. संबधित 24 पानी सुसाइड नोटमध्ये लग्नानंतर सुरू असलेल्या तणावाबद्दल तपशीलवार लिहिले आहे. उत्तर प्रदेशच्या न्यायालयात काय घडले? याचेदेखील तपशीलवार वर्णन दिले आहे. आत्महत्येपूर्वी अतुल सुभाषने दीड तासाचा एक व्हिडिओ तयार केला. त्यात त्याने हे पाऊल उचलण्यास भाग पाडलेल्या सर्व परिस्थितीचा उल्लेख केला.

हेही वाचा – Road Accident in Jammu Kashmir: बांदीपोरा येथे लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यू