घरक्राइममनीष सिसोदियांच्या कोठडीत वाढ, जामीनावरील निर्णय १० मार्चपर्यंत राखीव

मनीष सिसोदियांच्या कोठडीत वाढ, जामीनावरील निर्णय १० मार्चपर्यंत राखीव

Subscribe

माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिसोदियांना शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले.

माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिसोदियांना शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी सीबीआयने आणखी तीन दिवसांची कोठडी मागितली. परंतु, न्यायालयाने दोन दिवसांच्या कोठडीत वाढ केली आहे. तसेच, सिसोदियांच्या जामीन अर्जावर १० मार्च रोजी निर्णय येणार आहे. (bail petition was filed in the trial court yesterday)

सीबीआयने ८ तासांच्या चौकशीनंतर २६ फेब्रुवारीला सिसोदिया यांना अटक केली होती. त्यांना २७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सिसोदिया यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी दिली होती. त्यांची ही कोठडी आज ४ मार्च रोजी संपली. परंतु, शुक्रवारी सीबीआयने त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आणखी दोन दिवस त्यांच्या कोठडीत वाढ होणार आहे.

- Advertisement -

28 फेब्रुवारीला सकाळी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सिसोदिया यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली, त्याला मान्यता देण्यात आली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता या प्रकरणाची सुनावणी झाली.

दरम्यान, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि तुम्ही उच्च न्यायालयात जा, थेट आमच्याकडे येण्यात काय अर्थ आहे. आपण चुकीच्या परंपरेला चालना देऊ शकत नाही. दुसरीकडे, सिसोदिया यांच्या अटकेपूर्वी केजरीवाल सरकारमधील दुसरे मंत्री सत्येंद्र जैन हे तिहार जेलमध्ये आहेत. जैन व सिसोदिया यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज यांची नावे एलजीकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. आता सिसोदिया आणि जैन यांच्या खात्याची जबाबदारी कैलाश गेहलोत आणि राजकुमार आनंद यांच्याकडे असणार आहे. यासंदर्भात राजपत्रात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.


हेही वाचा – राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, ठाकरेंनी उपचार करावेत; देशपांडेंचा खोचक टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -