घरदेश-विदेश'पठाण' चित्रपटाचे पोस्टर लावल्याने अहमदाबादच्या मॉलमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर लावल्याने अहमदाबादच्या मॉलमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अहमदाबाद येथे पठाण चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बजरंग दलाकडून तोडफोड करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील अल्फावन मॉलमध्ये असलेल्या मल्टीप्लेक्समध्ये पठाण चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले होते. यावेळी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये जाऊन तोडफोड करायला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचे पोस्टर देखील फाडले. शिवाय हा चित्रपट इथे प्रदर्शित करायचा नाही अशी धमकी देखील कार्यकर्त्यांनी दिली.

- Advertisement -

या ठिकाणी घडणाऱ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटणास्थळी धाव घेतली आणि मॉलमध्ये तोडफोड करत असलेल्या कार्यकर्त्यांना 5 ताब्यात घेतलं.

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट हिंदीव्यतिरिक्त, तमिळ आणि तेलुगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

पठाण चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -