Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी बृजभूषण सिंह यांच्याऐवजी मला अटक का करताय? बजरंग पूनियाचा पोलिसांना सवाल

बृजभूषण सिंह यांच्याऐवजी मला अटक का करताय? बजरंग पूनियाचा पोलिसांना सवाल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु दुसरीकडे नवी दिल्लीतील जंतरमंतरवर काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले. याव्यतिरिक्त त्यांनी उभारलेले तंबूही हटवले. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जंतरमंतरहून नव्या संसदेच्या दिशेने निघालेले कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात झटापट आणि धक्काबुक्की झाली. विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या तिघांना तसंच समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, बृजभूषण सिंह यांच्याऐवजी मला अटक का करताय?, असा सवाल कुस्तीपटू बजरंग पूनियाने पोलिसांना विचारला.

बजरंग पूनियाने ट्वीट करत पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला आहे. मला अजूनपर्यंत पोलिसांनी ताब्यात ठेवलं आहे. मी कोणता गुन्हा केलाय?, याबाबत पोलीस काहीही सांगत नाहीयेत. खरं म्हणजे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे होतं. पण मला का अटक करण्यात आलीये? असा सवाल पूनियाने पोलिसांना विचारला आहे.

- Advertisement -

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचे आरोप कुस्तीपटूंनी केले आहेत. त्यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. बृजभूषण सिंह यांना अटक व्हावी, अशी कुस्तीपटूंची मागणी आहे.

- Advertisement -

कुस्तीपटूंना दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक – शरद पवार

लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.


हेही वाचा : ‘अहंकारी राजा’; कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईनंतर राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका


 

- Advertisment -