बाजवांच्या मुलाशी लग्न करण्याआधीच मुलगी झाली अब्जाधीश, मोठी बाब उघडकीस

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. परंतु जनरल बाजवा यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेबाबत मोठी बाब उघडकीस आली आहे. गेल्या सहा वर्षांत त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेत प्रचंड वाढ झाल्याचे कळते. एवढेच नाही तर बाजवा यांच्या मुलाशी लग्न करण्याच्या नऊ दिवस आधी लाहोरची एक मुलगीही अब्जाधीश झाली आहे.

मालमत्ता आणि व्यवसायाचे बाजार मूल्य 12.7 अब्ज

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या कुटुंबाची संपत्ती उघड करण्यात आली आहे. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील आणि बाहेरील मालमत्ता आणि व्यवसायांचे सध्याचे बाजार मूल्य 12.7 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे.

आर्मी चीफची सून होण्याच्या 9 दिवस आधी झाली कोट्यधीश

2 नोव्हेंबर 2018 रोजी, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा मुलगा साद बाजवा याचा लाहोरमधील रहिवासी महनूर साबीरशी विवाह झाला होता. महनूर साबीर तिच्या लग्नाच्या 9 दिवस आधी अचानक अब्जाधीश बनली. एका पाकिस्तानी वेबसाईटने केलेल्या खुल्यासानुसार, लग्नाच्या काही दिवस आधी महनूर अचानक अनेक संपत्तीची मालकीन बनली होती, तर तिच्या इतर तीन बहिणींच्या संपत्तीत कोणतीही वाढ झालेली नाही.

लग्नाच्या 9 दिवस आधी डीएएच प्लॉटचे वाटप

फॅक्टफोकसच्या रिपोर्टनुसार, बाजवा यांच्या मुलाच्या लग्नाच्या 9 दिवस आधी म्हणजेच 23 ऑक्टोबरला महनूर साबीरच्या नावावर गुजरांवालामध्ये 8 डीएएच भूखंड वाटप करण्यात आले होते. तथापि, नियमानुसार, डीएएचने जमिनीची मालकी संपादित केल्यानंतरच भूखंडांचे वाटप केले जाऊ शकते. याशिवाय, 23 ऑक्टोबर 2018 रोजी महनूर 2015 च्या मागील तारखेला कॉन्स्टिट्यूशन वन ग्रँड हयात अपार्टमेंटचा मालकही बनल्याचे समोर आले आहे.

यासोबतच जनरल कमर जावेद बाजवा यांच्या कुटुंबाने महनूर साबीरचे वडील साबीर ‘मिठू’ हमीद यांच्यासोबत संयुक्त व्यवसाय सुरू केला. याशिवाय साबीर ‘मिठू’ हमीदने पाकिस्तानबाहेर प्रचंड पैसा हस्तांतरित केला आणि परदेशातही मालमत्ता खरेदी केल्या.


हेही वाचा : तिकिटासाठी तब्बल ८० लाख.., आपच्या नेत्यांचं भाजपकडून स्टिंग, व्हिडीओ