घरदेश-विदेशBal Mukundacharya : आमदार होताच बाळ मुकुंदाचार्य 'योगी आदित्यनाथ मोड'वर; 'ही' दुकाने...

Bal Mukundacharya : आमदार होताच बाळ मुकुंदाचार्य ‘योगी आदित्यनाथ मोड’वर; ‘ही’ दुकाने करणार बंद

Subscribe

भोपाळ : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजपाने मध्य प्रदेशात 166 चा आकडा पार केला आहे आणि राजस्थानमध्येही बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. राजस्थानमध्ये भाजपाच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवसापासून पक्षाचे उमेदवार बाळ मुकुंदाचार्य अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Bal Mukundacharya on Yogi Adityanath mode as MLA  Meat shops will be closed)

हेही वाचा – MP Election Result : लाख मतांनी तर काहींनी केवळ 28 मतांनी मिळवला विजय; जाणून घेऊया उमेदवारांबद्दल…

- Advertisement -

भाजपा उमेदवार बाळ मुकुंदाचार्य यांनी जयपूर जिल्ह्यातील हवामहल विधानसभेतून 600 मतांनी निवडणूक जिंकली आहे. काँग्रेसचे आरआर तिवारी यांचा पराभव करत बाळ मुकुंदाचार्य आमदार झाले आहेत. विजयानंतर मोठ्या संख्येने समर्थक व इतर पक्षातील उमेदवार बाल मुकुंदाचार्य यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे काम करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील मांसाहाराची दुकाने हटवण्याची मोहीम सुरू केली आहे.

- Advertisement -

बाल मुकुंदाचार्य हे जयपूरच्या कलवाड रोडवर असलेल्या हथोज धामचे महंत आहेत. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. विजयानंतर त्यांनी जनतेमध्ये जाऊन अधिकाऱ्याला बोलावून घेतले आणि त्यांच्या परिसरातून सर्व मांसाहाराची दुकाने तत्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ते स्वत: अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन संपूर्ण अहवाल घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Raghav Chadha : AAP खासदार 115 दिवसांनंतर राज्यसभेत परतणार; विशेषाधिकार समितीकडून निलंबन रद्द

बाळ मुकुंदाचार्य यांनी केलेली कारवाई हुबेहुब योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसली. त्यांनी अधिकाऱ्याला इशारा दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ ते अधिकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत की, रस्त्यावर खुलेआम मांसाहार विकता येतो का? या प्रश्नावर अधिकाऱ्याने उघडपणे मांसाहार विक्रीला पाठिंबा दिला नाही. या उत्तराने बाळ मुकुंदाचार्य यांनी तत्काळ प्रभावाने खुलेआम विक्री होत असलेल्या मांसाहाराची दुकाने हटवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -