घरCORONA UPDATECoronavirus : कमाल! कोरोनावर फक्त ८५ रुपयात मिळतयं औषध

Coronavirus : कमाल! कोरोनावर फक्त ८५ रुपयात मिळतयं औषध

Subscribe

देशात सध्या कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेने साऱ्यांनाच अडचणीत आणले आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स. व्हेंटिलेटर, इंजेक्शन, औषधे तर आता फंगस इंफेक्शनवरील औषधांचा तुटवड्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. अशातच एका दिलासाजनक बातमी समोर येत आहे. आता कोरोना विषाणुविरोधातील उपचारांवरील एक औषध फक्त ८५ रुपयात खरेदी करता येत आहे. देशात लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ८५ रुपयाचे औषध फायदेशीर ठरेल.

बाल फार्मा या औषध उत्पादन घेणाऱ्या कंपनीने सोमवारी कोरोनावरील उपचारांसाठी बालफ्लू ब्रँडच्या नावाने फैविपिरावीर हे अँटीवायरस औषध बाजारात आणले. हे औषध ४०० एमजी टॅबलेटच्या स्वरुपात असून त्यातील प्रति टॅबलेटची किंमत ८५ रुपये आहे. फैविपिरावीर या औषधाचा उपयोग कोरोनाची सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर करता येणार आहे. या औषधाचा वापर ५३ प्रकारच्या विषाणूंच्या उपचारासाठी केला जाऊ शकतो. तसेच भारतीय औषध महानियंत्रणने (DCGI) कोरोना उपचारांसाठी बालफ्लूच्या औषधाला आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.असे बंगळूरस्थित बाल फार्मा या कंपनीने सांगितले आहे.

- Advertisement -

Mumbai Lockdown : इतर दुकानेही खुली ठेवण्यासाठी वेळ वाढवून मिळण्याची शक्यता


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -