ओडीसा : बालासोर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन रेल्वे अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआय (CBI) ने आरोपपत्र दाखल केले आहे. या अटक करण्यात आलेल्या रेल्वे अधिकार्यांवर भादवि कलम 304(2), 201 सह कलम 34 आणि रेल्वे कायदा 1989 च्या कलम 153 अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत.(Balasore train accident: CBI files charge sheet against accused officials)
ओडीसा राज्यातील बालासोर येथे 2 जुलै रोजी रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना घडली होती. यामध्ये अनेकांचा बळी गेला होता. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुण कुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ज्ञ पप्पू कुमार यांना यापूर्वी सीआरपीसीच्या कलम 304 आणि 201 अंतर्गत अटक करण्यात आली होती. ज्या कलमांखाली त्याला अटक करण्यात आली ते पुरावे नष्ट करणे आणि हत्येचे प्रमाण नसून दोषी मनुष्यवधाशी संबंधित होते.
हेही वाचा : राजेंसाठी मसणवट्यात जाऊ पण…: आंदोलनकर्त्यांनी उदयनराजेंचा शब्द राखला
तपासानंतर आरोपपत्र दाखल
सिग्नल आणि दूरसंचार विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे 2 जून रोजी हा भीषण अपघात झाल्याचे रेल्वे अपघाताच्या तपासात समोर आले आहे. 2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्सप्रेसने स्टेशनच्या लूपलाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. एकाच वेळी डाऊन मार्गावरून (हावडा बाजूने) जात असलेल्या बंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचे शेवटचे दोन डबे कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांशी आदळले आणि उलटले होते.
हेही वाचा : भारतीय वंशाचे थर्मन षणमुगारत्नम सिंगापूरचे नवे राष्ट्रपती; याआधी होते उपपंतप्रधान
288 जणांचा मृत्यू,1100 हून अधिक जखमी
2 जुन रोजी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 288 जणांचा बळी गेला होता. तर 1100 हून अधिक जण जखमी झाले होते. अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच याला जबाबदार असलेल्या लोकांचीही ओळख पटली असल्याचेही ते म्हणाले होते. तसेच त्यांनी हा अपघातात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला होता.