घरक्राइमBalesh Dhankhar: ऑस्ट्रेलियातील बलात्कार प्रकरणात 'ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी'चा अध्यक्ष दोषी

Balesh Dhankhar: ऑस्ट्रेलियातील बलात्कार प्रकरणात ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’चा अध्यक्ष दोषी

Subscribe

बालेश धनखरवर नोकरीच्या बहाण्याने मुलींना फसवून आपल्या अपार्टमेंटमध्ये बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तो त्यांना अंमली पदार्थ देत असे. मुली बेशुद्ध झाल्यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करायचा.

बालेश धनखर हा भारतीय वंशाचा असून तो ऑस्ट्रेलियात राहतो. बालेश हा ऑस्ट्रेलियातील ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’चा अध्यक्ष आहे. ४३ वर्षीय बालेश धनखर हा सिडनीमध्ये डेटा एक्सपर्ट म्हणून काम करतो. सोमवारी सिडनीच्या डाऊनिंग सेंटर जिल्हा न्यायालयाने बालेशला पाच कोरियन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले. बालेशने या महिलांना अंमली पदार्थ देऊन बेशुद्धावस्थेत बलात्कार केला. ऑस्ट्रेलियाच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात वाईट बलात्कारी असे स्थानिक माध्यमांनी बालेश धनखरचे वर्णन केले आहे. ( Balesh Dhankhar President of Overseas Friends of BJP convicted in Australia rape case )

काय आहे संपूर्ण प्रकरण

बालेश धनखरवर नोकरीच्या बहाण्याने मुलींना फसवून आपल्या अपार्टमेंटमध्ये बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तो त्यांना अंमली पदार्थ देत असे. मुली बेशुद्ध झाल्यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करायचा. एवढेच नाही तर तो त्याच्या बेडसाइड अलार्म क्लॉक आणि फोन कॅमेऱ्याने महिलांवर बलात्कार करतानाचे व्हिडिओ बनवत असे. पोलिसांनी आरोपींकडून असे अनेक व्हिडिओ जप्त केले आहेत. महिला बेशुद्ध अवस्थेत असून धनखर त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अशा स्थितीत काही स्त्रिया अर्ध-बेशुद्ध अवस्थेतही स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यातील एक व्हिडिओ 95 मिनिटांचा होता, ज्यामध्ये तो कोरियन महिलांवर बलात्कार करत आहे.

- Advertisement -

हे व्हिडीओ इतके अस्वस्थ करणारे होते की जेव्हा ते कोर्टात चालवले गेले तेव्हा ज्युरीही अस्वस्थ आणि त्रस्त दिसले. त्यांनी एकदा व्हिडिओ बंदही करायला लावला. पुढील महिन्यात न्यायालय धनखरला या आरोपांवर शिक्षा सुनावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनखरने कोरियन महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी खोटे बोलले होते की, त्याचे पत्नीशी संबंध तोडले आहेत आणि आता तो एकटा आहे. मात्र, धनखरला दोषी ठरवताना त्याची पत्नीही रडली. तिनेही पतीची बाजू घेतली.

( हेही वाचा: महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी; FIR दाखल न केल्याने दिल्ली पोलिसांना नोटीस )

- Advertisement -

धनखरने त्याच्या कायदेशीर बचावासाठी कुटुंबाची मालमत्ता विकली होती. 2018 मध्ये पोलिसांना धनखरचे इतर महिलांसोबतचे डझनभर व्हिडिओ मिळाले होते. व्हिडिओ फोल्डरमध्ये क्रमवारीने लावले होते, प्रत्येकाला कोरियन महिलेच्या नावाने लेबल केले होते. धनखरच्या ब्राउझरमध्ये बुकमार्कची मालिका सापडली. 95 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तो बेशुद्ध महिलांवर बलात्कार करताना दिसत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -