GangRape Victim: हाथरस घटनेसारखेच बलरामपूरातील पीडितेवरही रातोरात अंत्यसंस्कार

15 people rape on two sisters 6 days in Pakistan

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरूणीच्या बलात्काराची घटना ताजी असतानाच या राज्यातील आणखी एका सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याही पीडितेवर काल रातोरात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये एका २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची घटना घडली होती. काल, बुधवारी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात करत गैंसडी येथे पीडितेवर रातोरात अंत्यसंस्कार करण्यात आले. कॉलेजची फी भरून घरी परतात असताना या तरुणीवर मंगळवारी सामुहिक बलात्कार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरस आणि मध्य प्रदेशातील खारगाव येथील बलात्काराच्या घटनांनीही देशात खळबळ माजली आहे. त्यात बलरामपूरच्या घटनेने लोकांमध्ये संतापाची लाट आहे.

या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेख यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हाथरसनंतर आता बलरापूरमध्येही एका मुलीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे आणि गंभीर अवस्थेत तिचा मृत्यू झाला आहे. भाजपा सरकारनं बलरामपूरमध्ये हाथरसप्रमाणे निष्काळजीपणे वागू नये आणि गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करावी.

दोन मित्रांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिची कंबर आणि पाय मोडले गंभीर अवस्थेत असलेल्या या मुलीला रिक्षातून घरी पाठवले. नंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तिला आधी इंजेक्शन दिले गेले आणि मग तिच्यावर आत्याचार केला गेला, असा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रचंड वेदना होत आहेत. आता मी वाचू शकणार नाही, असे गंभीर अवस्थेत आलेल्या मुलीने मृत्युपूर्वी म्हणाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहिद आणि साहिल अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती बलरामपूर पोलिसांनी दिली.

हेही वाचा –

हाथरस प्रकरण ताजे असताना मध्यप्रदेशात अल्पवयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार