नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषण पाहता गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या दिवाळीतही फटाके विक्री आणि फोडण्यावर बंदी कायम राहणार आहे. दिल्ली सरकारने यासंदर्भात दिल्ली पोलिसांना सूचना दिल्या आहेत. तसेच शेजारील राज्यांनाही फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे. (Ban on sale and bursting of firecrackers in Delhi this year too Delhi governmens decision what is the reason)
हेही वाचा – चंद्र-सूर्य झाला आता खोल पाण्यातील रहस्य उलगडण्याची तयारी; ‘समुद्रयान’ मोहिमेची चाचपणी सुरू
हिवाळ्यात प्रदूषण रोखण्यासाठी कृती योजनेचा एक भाग म्हणून फटाक्यांची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी घातल्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. कोणालाही फटाक्यांशी संबंधित परवाने देऊ नये, अशा सूचनाही दिल्ली सरकारने दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. फटाक्यांवर बंदी घालण्याची घोषणा करताना दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, शेजारील राज्यांनाही फटाक्यांवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिवाळ्याच्या काळात दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि सर्वोच्च न्यायालय/एनजीटीच्या निर्देशांमुळे दिल्लीच्या केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Hon’ble Environment Minister @AapKaGopalRai briefing the media on an important issue | LIVE https://t.co/yYxEvtd10N
— Aam Aadmi Party Delhi (@AAPDelhi) September 11, 2023
फटाक्यावरील बंदीसंदर्भात अहवाल सर्वोच्च न्यायालयात होणार सादर
दिल्लीत फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी याचिका गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची आणि फक्त हिरव्या फटाक्यांची विक्री करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अहवाल सादर करताना वायूप्रदर्शनाला सामोरे जाण्यासाठी प्रभावी कायदेशीर आणि व्यावहारिक उपाययोजनांबद्दल म्हणजेच नियमाक यंत्रणाबद्दल माहिती द्यावी, जेणेकरून फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदी घालावी की नाही याबाबत अंतिम निर्णय घेता येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.
हेही वाचा – सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी पतीला अटक; काय होती प्लॅनिंग?
वायू प्रदूषणामुळे दिल्ली गॅस चेंबर
गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थंडीच्या काळात दाट धुक्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या बऱ्याच लोकांना थंडीच्या काळात श्वास घेणेही कठीण होते. तसेच वायू प्रदूषणामुळे दिल्लीचे गॅस चेंबर बनले आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी दिल्ली सरकारने दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.