Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश INDIA नावावर येणार बंदी ? जयराम रमेश यांच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री राजीव...

INDIA नावावर येणार बंदी ? जयराम रमेश यांच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं उत्तर

Subscribe

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं की, मी एक भारतीय आहे माझ्या देशाचे नाव भारत होते आणि नेहमीच भारत राहील. काँग्रेसला काही समस्या असेल तर त्यांनी स्वत: त्यावर उपाय शोधायला हवा.

देशाचे नाव INDIA वरून भारत असे बदलले जाऊ शकते, अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे. 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात देशाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे यावरून राजकारणही तापले आहे. विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधत आहेत, तर सरकारकडूनही प्रत्युत्तर सुरू आहे. (Ban on the name INDIA Union Minister Rajeev Chandrasekhar s reply to Jairam Ramesh s claim)

जयराम रमेश यांचा मोठा दावा

वास्तविक, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोठा दावा केल्यावर देशाचे नाव बदलण्याच्या वृत्ताला अधिक बळ मिळालं आहे. जयराम म्हणाले की, राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 डिनरच्या निमंत्रण पत्रात ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिले आहे.

- Advertisement -

यावर आरजेडी नेते मनोज झा यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मनोज झा म्हणाले की, काही आठवड्यांपूर्वीच आम्ही आमच्या युतीचे नाव इंडिया ठेवलं होतं. आता भाजपने रिपब्लिक ऑफ इंडिया’ ऐवजी ‘रिपब्लिक ऑफ भारत’ लिहून आमंत्रणे पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘ घटनेच्या कलम 1 मध्ये लिहिले आहे की, इंडिया हा भारत आहे’ . मनोज झा म्हणाले की, तुम्ही ना आमच्याकडून इंडिया हिसकावून घेऊ शकलात ना भारत.

केंद्रीय मंत्री काय म्हणाले?

दुसरीकडे, या प्रकरणावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जयराम रमेश यांच्या दाव्यावर राजीव म्हणाले की, त्यांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे त्यामुळे मला काही बोलायचे नाही. मी एक ‘भारतीय’ आहे, माझ्या देशाचे नाव ‘भारत’ होते आणि नेहमीच ‘भारत’ राहील. काँग्रेसला काही समस्या असेल तर त्यांनी स्वत: त्यावर उपाय शोधायला हवा.

- Advertisement -

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिलं की रिपब्लिक भारत – मी आनंदी आणि अभिमान आहे की आपली सभ्यता धैर्याने अमरत्वाकडे वाटचाल करत आहे.

(हेही वाचा: G-20 Summit : मोदी सरकारच्या ‘भारत’ला विरोधकांचा आक्षेप, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणतात… )

- Advertisment -