घरदेश-विदेश‘जाॅन्सन अ‌ॅंड जॉन्सन’च्या उत्पादनावर भारताने आणली बंदी!

‘जाॅन्सन अ‌ॅंड जॉन्सन’च्या उत्पादनावर भारताने आणली बंदी!

Subscribe

राष्ट्रीय बाल अधिकार सरंक्षण आयोगाने बहुराष्ट्रीय कंपनी जाॅन्सन अ‌ॅड जॉन्सनला मोठा दणका दिला आहे. जाॅन्सन अ‌ॅड जॉन्सनच्या सर्व वस्तूंच्या उत्पादनावर आयोगाने बंदी आणली आहे.

लहान मुलांचे उत्पादन तयार करणारी जगप्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची अडचणीत भर पडली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी शॅम्पूमध्ये कर्करोग होण्यासारख्या घटकांचा समावेश असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेने या उत्पादनाच्या विक्रीवर बंदी आणावी याकरिता राज्यांना पत्र लिहिले आहे. बेबी शॅम्पू आणि टालकम पावडरमध्ये कॅन्सरला जबाबदार घटक असल्यामुळे सर्व राज्यातील विक्रीवर बंदी घालण्यात आली. तसेच संबंधित उत्पादने बाजारातून हटवण्याचे आदेश देण्यात आले.

अमेरिकेतही या कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घालण्यात आली असून भारतात पहिल्यांदाच जॉन्सन कंपनीच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) कडून सर्व राज्य तसेच, केंद्रशासित राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

राजस्थानात कॅन्सरचे घटक मिळाल्यामुळे कारवाई

राजस्थानमधील एका बाजारात जॉन्सन अ‌ॅंड जॉन्सन बेबी शाम्पू तसेच टालकम पावडरमध्ये एस्बेस्टॉस आणि कॅन्सरला जबाबदार घटक सापडले. आयोगाने आंध्रप्रदेश, राजस्थान, झारखंड, मध्यप्रदेश आणि आसामच्या मुख्य सचिवांना जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या उत्पादनाचे नमुने घेऊन अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

जॉन्सन कंपनीला परदेशात कोटी रुपयांचा भुरदंड

यापूर्वीही जॉन्सन अ‌ॅंड जॉन्सनच्या अनेक उत्पादनं लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे समोर आले होते. परदेशात याविरोधात मोठी कारवाई झाली होती. तसेच कंपनीला कोट्यावधी रुपयांचा दंड भरावा लागला होता. राऊटर्सच्या इन्वेस्टीगेशनमुळे याचा खुलासा झाला आहे. त्यानंतर ९ हजारपेक्षा अधिक लोकांनी या कंपनीविरोधात तक्रारी केल्या होत्या. कंपनीच्या उत्पादनामध्ये एस्बेस्टॉस आहे. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, असा आरोप अनेकांनी केला आहे. कोर्टानेही पीडित परिवारांना नुकसान भरपाई देण्यासाठी जॉन्सन कंपनीला अंदाजे ४.७ अब्ज डॉलर देण्यास भाग पाडले.

- Advertisement -

आरोग्यास हानिकारक एस्बेस्टॉस

एस्बेस्टॉस एक धोकादायक असा पदार्थ आहे. आरोग्यासाठी हा हानिकारक आहे. आपल्या शरीरात हा पदार्थ गेला, तर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका वाढतो. या बेबी पावडरच्या वापरामुळे बाळांसह आईलाही धोका होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -