घरदेश-विदेशबाबा रामदेव पुन्हा वादात; पतंजली समूहाच्या 'या' पाच औषधांवर बंदी

बाबा रामदेव पुन्हा वादात; पतंजली समूहाच्या ‘या’ पाच औषधांवर बंदी

Subscribe

दिव्य फार्मसीच्या मार्फत बनविल्या जाणाऱ्या या औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत असा दावा करण्यात आला आहे.

योगविद्येचे गुरु अशी बाबा रामदेव (baba ramdev) यांची यांची ओळख आहे. बाबा रामदेव या नासोबतच पतंजली (patanjali) हे नाव घेतले जाते. पतंजली ग्रुपची विविध उत्पादने आहेत. ही सर्व उत्पादने देशभरात वापरली जातात. याच पतंजली ग्रुपच्या पाच औषधांवर आता बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश आहे उत्तराखंड (uutarakhand) आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने दिले आहेत.

हे ही वाचा – मी अमित शाहांना भेटून विचारणार…; संजय राऊतांनी सांगितली पुढील रणनीती

- Advertisement -

दिव्य फार्मसीच्या मार्फत बनविल्या जाणाऱ्या या औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत असा दावा करण्यात आला आहे. या प्राधिकरणाने असे म्हटले आहे की, या औषधांच्या उत्पादनासाठी दिव्य फार्मसीने पुन्हा परवानगी घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा –  SCचा निर्णय पूर्णतः चुकीचा, राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडल्याप्रकरणी काँग्रेस नाराज

- Advertisement -

दरम्यान पतंजली ग्रुपच्या (patanjali gropu) बीपीग्रीट, मधुग्रीट, थायरोग्रीट, लिपिडोम टॅबलेट, आयग्रीट गोल्ड टॅबलेट या पाच औषधांच्या उत्पादनावर आता बंदी घालण्यात आली आहे. रक्तदाब, मधुमेह, ग्लुकोमा, हाय कोलेस्टरॉल या समस्यांवर ही औषधे असल्याचा दावा करण्यात येत आहे. या औषधांविरोधात केरळमधील डॉक्टर के. व्ही. बाबू यांनी तक्रार केली होती. याबाबत आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही असे पतंजली ग्रुपचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितले.

दरम्यान पतंजली ग्रुपची विविध ऊत्पादने आहेत. ही सर्व उत्पादने नैसर्गिक असल्याचे बाबा रामदेव यांनी जाहिरातींमधून सांगितल्याचे पाहायला मिलाले. उत्तराखंड राज्यातील हरिद्वारमध्ये पतंजलीच्या सर्व उत्पादनांची निर्मिती होते. पतंजलीची विविध उत्पादने देशभरात उपलब्ध असून ती वापरलीही जातात.

हे ही वाचा – कॉम्प्युटर पाहिला नाही, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचं स्वप्न; राहुल गांधींनी मुलाला दिला मदतीचा हात

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -