जम्मू : उत्तर काश्मिरातील बांदीपोरा भागात एक मोठा अपघात झाला आहे. शनिवार, 4 जानेवारी रोजी भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, जम्मू – काश्मीर पोलीस आणि अन्य जवान इतरांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. (bandipora accident 2 soldiers dead 3 critical as army vehicle falls into gorge in jammu kashmir)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरी काश्मीर जिल्ह्यात लष्कराचे वाहन घसरून दरीत कोसळले. हा अपघात होता की घातपात, दहशतवाद्यांनी घडवून आणलेला हल्ला आहे का, याबाबत अजूनतरी काही समोर आलेले नाही. दरम्यान, पोलीस आणि लष्कराचे जवान सध्या बचावकार्य करत आहेत. तसेच अपघातामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी
बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इकबाल वानी यांनी सांगितले की, पाच जखमींना येथे आणण्यात आले. त्यातील दोघांचा आणण्यापूर्वीच मृत्यू झाला. ज्या जखमींची प्रकृती गंभीर होती, त्यांना श्रीनगरला पाठविण्यात आले.
एका वळणावर ट्रक वळवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाने ट्रकवरील नियंत्रण गमावले. यानंतर ट्रक थेट दरीत जाऊन कोसळला. अपघातानंतर तातडीने या जवानांना जवळच्याच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यातील चौघांचा मृत्यू झाला.
यापूर्वी जम्मू – काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये 24 डिसेंबर 2024 एक अपघात झाला होता. यात लष्कराचे एक वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले होते. पूँछ सेक्टरमधील ऑपरेशनल ड्युटीदरम्यान हा अपघात झाला होता. या अपघातात 5 सैनिकांचा मृत्यू झाला.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर 2024 रोजी पूँछ जिल्ह्यातील मेंढर येथे नियंत्रण रेषेजवळ बलनोई भागात सेनेच्या वाहनाचा अपघात झाला. संध्याकाळी 6 च्या सुमारास लष्कराचे वाहन जवानांसाठी जात असताना अपघात झाला. हे लष्करी वाहन जवळपास 100 फूट खोल दरीत पडले. या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला तर पाच गंभीर जखमी झाले.