घरदेश-विदेशपुरावा नसताना चारित्र्यावर शिंतोडे उडवणे क्रूरता, बंगळुरू कोर्टाचा निर्णय

पुरावा नसताना चारित्र्यावर शिंतोडे उडवणे क्रूरता, बंगळुरू कोर्टाचा निर्णय

Subscribe

कोणताही पुरावा नसताना एकमेकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे पती-पत्नीला महागात पडणार आहे. चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर तो आरोप कोर्टात सिद्ध करता आला नाही, तर ती क्रूरता मानून पती अथवा पत्नीला घटस्फोटाची परवानगी मिळणार आहे. बंगळुरू येथील कोर्टाने पत्नीला पतीच्या चारित्र्यावर केलेले आरोप सिद्ध न करता आल्याने पतीच्या बाजूने निर्णय देत त्याला घटस्फोटाची संमती दिली आहे.

अनैतिक संबंधाचे पतीवर आरोप
पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश विनीत कोठारी आणि न्यायाधीश एसबी प्रभाकर शास्त्री यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. पती-पत्नीवर बिनबुडाचे आरोप करणे किंवा चारित्र्यावर निराधार संशय घेणे म्हणजे ही मानसिक क्रूरता आहे, असे कोर्टाने नमूद केले आहे. घटस्फोटीत पत्नीला उदरनिर्वाहासाठी १० लाख रुपये द्यावे. तसेच फॅमिली कोर्टाच्या आदेशानुसार मुलाच्या पालनपोषणासाठी ७,५०० रुपये द्यावे, असे कोर्टाने आदेश दिले आहेत. पती भांडखोर असून या स्वभावामुळे पतीची बेंगळुरूहून पुण्याला बदली झाली. तसेच पतीने मारहाण करीत आपल्याला घराबाहेर काढले. पतीचे अन्य महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत, असा आरोप महिलेने केला होता. परंतु, हे आरोप महिलेला कोर्टात सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे कोर्टाने पतीला घटस्फोटाची संमती दिली.

- Advertisement -

१५ वर्षांचा संसार मोडला
या जोडप्याचे लग्न ५ डिसेंबर २००३ साली बंगळुरूमध्ये झाले होते. २००९ नंतर या दोघांत क्षुल्लक कारणांवरून भांडणं सुरू झाली. पतीसोबत भांडण करून माहेरी गेलेली पत्नी पुन्हा सासरी आली नाही, असे पतीचे म्हणणे आहे. दरम्यान, पतीवर लावलेले सर्व आरोप महिलेला सिद्ध करता न आल्याने कोर्टाने पतीच्या बाजूने निर्णय देत त्याला घटस्फोटाची संमती दिली.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -