Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशBangladesh : हिंदूंवरील अत्याचारावर बांगलादेश सरकार म्हणाले, हे म्हणजे विनाकारण...

Bangladesh : हिंदूंवरील अत्याचारावर बांगलादेश सरकार म्हणाले, हे म्हणजे विनाकारण…

Subscribe

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराविरोधात आता बांगलादेश सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यापासून देशात हिंदूवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले होते. यावरून आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हिंदूंविरोधातील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे ठरवले आहे. ते म्हणाले की, “हिंदू समाजाच्या सदस्यांसह देशातील कोणताही नागरिक हिंसाचाराचा बळी होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आम्ही हा प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत,” असा विश्वास त्यांनी देशातील हिंदू अल्पसंख्यांकांना दिला आहे. यावेळी त्यांनी, धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये विनाकारण भीती पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा केला आहे. (Bangladesh chief Advisor Muhammad Yunus downplayed violence country Hindu minority)

हेही वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी जयंत पाटलांना काय सुनावलं, रायगडमधील राजकारणाला नवा ट्विस्ट ?

- Advertisement -

मोहम्मद युनूस म्हणाले की, ” आमचे सरकार धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार झालेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करत आहे. काही प्रकरणांमध्ये आम्हाला हिंसाचारालाही सामोरे जावे लागले. याबद्दल जी काही प्रसिद्धी झाली ती पूर्णपणे अतिशयोक्तीपूर्ण आहे. या घटनांना धार्मिक रंग देऊन पुन्हा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे आरोप त्यांनी यावेळी केले आहेत. “सरकार सर्वांच्या सहकार्याने परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जात आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन महिन्यांत देशभरातील सुमारे 32 हजार पूजा मंडपांमध्ये दुर्गापूजा साजरी करण्यात आली.” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

“सरकारने दुर्गापूजेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तयारी केली होती, ज्यामुळे हिंदू समुदायाचे सदस्य हा सण सुरळीतपणे साजरा करू शकतील.” अशी माहिती यावेळी मोहम्मद युनूस यांनी दिली. दरम्यान, बांगलादेशात 17 कोटी लोकसंख्येमध्ये हिंदूंची संख्या सुमारे 8 टक्के आहे. यंदाच्यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या प्रचंड आंदोलनामुळे सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर हसीना भारतात गेल्याची माहिती असल्याचेही युनूस यावेळी म्हणाले. आपल्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्राला संबोधित करताना युनूस म्हणाले की, “आमचे सरकार धार्मिक अल्पसंख्याकांसह सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्हाला हत्येच्या प्रत्येक प्रकरणात न्याय मिळावा. आम्ही भारताला हुकूमशहा शेख हसीना यांना परत पाठवण्यास सांगू.” असेदेखील ते म्हणाले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -