Homeदेश-विदेशHindu in Bangladesh : हिंदू संत चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला;...

Hindu in Bangladesh : हिंदू संत चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला; अपिलात जाण्याचा निर्णय

Subscribe

हिंदू संत आणि इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज बांगलादेशातील एका न्यायालयाने फेटाळला. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय दास यांना 25 नोव्हेंबर रोजी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

ढाका : हिंदू संत आणि इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज बांगलादेशातील एका न्यायालयाने फेटाळला. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय दास यांना 25 नोव्हेंबर रोजी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. (bangladesh court rejects bail plea of hindu monk chinmoy krishna das)

चिन्मय कृष्ण दास यांना यापूर्वीही एकदा जामीन नाकारण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय दास यांना 25 नोव्हेंबर रोजी ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. यापूर्वी ते इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस अर्थात इस्कॉनसोबत जोडलेले होते.

हेही वाचा – IAS Transfer : नवीन वर्षात मुख्यमंत्री फडणवीसांनी भाकरी फिरवली; 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

बांगलादेश समिलित सनातनी जगरण जोते संघटनेचे प्रवक्ता असलेल्या दास यांचा जामीन 26 नोव्हेंबर रोजी चट्टोग्रामच्या 6 व्या मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट काजी शारिफुल इस्लाम यांनी देशद्रोहाचा आरोप लावण्यात आल्याने रद्द केला होता. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.

चट्टोग्राम जिल्हा बार संघाचे अध्यक्ष नाजिम उद्दीन चौधरी यांचे म्हणणे आहे की, सरकारने चिन्मय दास यांना जामीन देण्यास विरोध केला आहे. दास यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. या आरोपाखाली त्यांना जन्मठेप देखील होऊ शकते.

मेट्रोपोलिटन सरकारी वकील ऍड. मफिजुल हक भुइया म्हणाले की, चट्टोग्राम मेट्रोपोलिटन सत्र न्यायाधीश सैफुल इस्लाम यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद जवळपास अर्धा तास ऐकून मग त्यावर निर्णय दिला.

जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे चिन्मय दास यांचे वकील अपूर्व कुमार भट्टाचार्य यांनी सांगितले.

बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली चिन्मय दास यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर बांगलादेशात सातत्याने निदर्शने सुरू आहेत. त्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून 25 नोव्हेंबर रोजी त्यांना ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली.

हेही वाचा – Devendra Fadnavis : माओवादग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी…पंतप्रधान मोदींकडून राज्य सरकारचे कौतुक

बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी काऊंसिलने 29 डिसेंबर 2024 रोजी सांगितले की, चिन्मय दास यांच्या विरोधात चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.