Eco friendly bappa Competition
घर क्रीडा बांगलादेशचे क्रिकेटर आजपासून संपावर; भारत दौऱ्यावर प्रश्नचिन्ह

बांगलादेशचे क्रिकेटर आजपासून संपावर; भारत दौऱ्यावर प्रश्नचिन्ह

Subscribe

पुढील महिन्यातच बांगलादेश क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येत आहे. पण खेळाडूंच्या संपामुळे भारत दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही, असे सांगत बांगला देशातील क्रिकेटर्सनी आजपासून संप पुकारला आहे. मानधन वाढावे यासह त्यांनी इतर ११ मागण्या बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे केल्या आहेत. दरम्यान पुढील महिन्यातच बांगलादेश क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येत आहे. पण खेळाडूंच्या संपामुळे भारत दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

असा असेल भारत दौरा

बांगलादेश क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडूंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शाकिब अल हसन, महमुदुल्ला, मुशफिकर रहिम उपस्थित होते. यावेळी बांगलादेशचे क्रिकेटपटू आजपासून संपावर जाणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली. क्रिकेटच्या व्यवस्थापनाबाबत खेळाडूंनी तक्रार केली आहे. क्रिकेटच्या व्यवस्थापनावर खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे यावेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बांगलादेश प्रीमिअर लीगच्या नियमात केलेल्या बदलावर क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली. या नियमानुसार बीसीएलमध्ये संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान एक लेग स्पिनरचा समावेश करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एवढेच नाही तर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दोन संघांच्या प्रुमख प्रशिक्षकांना बांगलादेश क्रिकेट बोर्डानं निलंबित केलं होतं. गेल्या महिनाभरापासून खेळाडू याविरोधात आवाज उठवत आहेत. दरम्यान, पुढील महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामने खेळले जाणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -