Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशBangladesh Crisis : देशातील अराजकतेला आपणच कारणीभूत, सैन्यप्रमुखांना चिंता

Bangladesh Crisis : देशातील अराजकतेला आपणच कारणीभूत, सैन्यप्रमुखांना चिंता

Subscribe

देशात राष्ट्रीय एकत्मतेची भावना निर्माण करणे आणि शिस्तीची नितांत गरज आहे. समाजात संघर्ष आणि रक्तपात सुरूच राहिला तर, देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता धोक्यात येऊ शकते, तुम्ही आपापसातले मतभेद विसरून एकत्र आला नाहीत आणि एकमेकांवर आरोप करत राहिलात तर, देशाचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा सैन्यप्रमुखांना दिला.

(Bangladesh Crisis) ढाका : गेल्या वर्षभरापासून बांगलादेश धुमसतच आहे. आरक्षण कोट्यावरून विद्यार्थ्यांनी केलेल्या देशव्यापी आंदोलनामुळे तिथे सत्तापालट झाला. अवामी लीगच्या सर्वेसर्वा शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेशमधून बाहेर पडत त्या थेट भारतात दाखल झाल्या. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ 84 वर्षीय मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून देशाची सूत्रे हाती घेतली. पण देशातील परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत. महिला आणि मुलांवरील सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ढाका येथे मोठ्या संख्येने निषेध मोर्चा काढला होता. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशचे सैन्यप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी, देशातील बिघडत्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (Army chief worries about law and order)

राजकीय उलथापालथीमुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. अलीकडच्या काळात जी अराजकता पाहात आहोत, ती आपणच निर्माण केलेली आहे, असे जनरल जमान यांनी एका लष्करी कार्यक्रमात सांगितले. पोलीस दलाच्या अकार्यक्षमतेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. आपले सहकारी एकतर तुरुंगात आहेत किंवा त्यांच्यावर खटले दाखल आहेत, त्यामुळे अनेक अधिकारी भीतीच्या छायेत जगत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – Sanjay Raut : ‘मंत्री महागड्या कार, तर जनता एसटीतून प्रवास करते, त्यात…’, पुण्यातील घटनेवरून राऊतांचा संताप

देशात राष्ट्रीय एकत्मतेची भावना निर्माण करणे आणि शिस्तीची नितांत गरज आहे. समाजात संघर्ष आणि रक्तपात सुरूच राहिला तर, देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता धोक्यात येऊ शकते, तुम्ही आपापसातले मतभेद विसरून एकत्र आला नाहीत आणि एकमेकांवर आरोप करत राहिलात तर, देशाचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात हिंसाचार, तोडफोड आणि दंगली असे प्रकार वाढले आहेत. फेब्रुवारीमध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली की, सुरक्षा दलांनी ऑपरेशन ‘डेव्हिल हंट’ नावाची मोठी कारवाई सुरू केली. यामध्ये 8 हजार 600हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. हे सर्व देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते, असा दावा अंतरिम सरकारने केला आहे.

गेल्या ऑगस्टमध्ये पंतप्रधान शेख हसीना पायउतार झाल्यानंतर पोलिसांप्रमाणे अटकसत्र राबविण्याचे अधिकार सैन्याला देण्यात आले होते. या काळात, लोकांना बेपत्ता करणे, खून आणि छळाचे आरोपही सैन्यावर करण्यात आले. त्याबाबत जनरल जमान म्हणाले की, या आरोपांची चौकशी होणे आवश्यक आहे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा आपण पुन्हा त्याच चक्रात अडकू. तसेच, युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन सैन्यप्रमुखांनी लोकांना केले. पुढील निवडणुका 2025च्या अखेरीस किंवा 2026च्या सुरुवातीला होतील.

हेही वाचा – Pune Crime : कायदा-सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घ्या, सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन