घरताज्या घडामोडीBangladesh Earthquake: भारत-बांग्लादेश सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

Bangladesh Earthquake: भारत-बांग्लादेश सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

Subscribe

युरोपीयन-भूमध्य भूकंप केंद्राने (European-Mediterranean Seismological Centre -EMSC) दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि बांग्लादेशच्या सीमेवर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास भूंकपाचे धक्के जाणवले. ६.३ रिश्टर स्केलचे हे भूंकपाचे धक्के होते. या भूकंपाच्या हादऱ्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोकं घराबाहेर पडली होती. तसेच काही लोकांनी भूकंपापासून बचाव करण्यासाठी सुरक्षेच्या ठिकाणी धाव घेतली होती.

- Advertisement -

बांग्लादेशच्या चटगाव (Chittagong) आणि भारताच्या कोलकातामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. बांग्लादेशच्या चटगावहून १७५ किमी पूर्वकडे भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केल ६.३ असल्याची नोंद झाली आहे. अजूनपर्यंत या भूकंपामध्ये कोणतीही जीवतहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. माहितीनुसार, या भूकंपाचे झटके पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाममध्येही जाणवले.

या भूंकपाच्या दरम्यान लोकं झोपले होते. भूकंपाचे झटके जाणवताच लोकं घराबाहेर येऊन पळू लागले. भूकंपाचा परिणाम बांग्लादेश आणि भारत व्यतिरिक्त म्यांमार देखील बसला. भूकंप झाल्याचे समजाताच स्थानिक प्रशासन अलर्ट झाले आहे.

- Advertisement -

 

गुरुवारी रात्री रत्नागिरीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. रत्नागिरीतील देवरुख परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. महिन्याभरात आतापर्यंत रत्नगिरीमध्ये तीन भूकंप जाणवले आहेत.


हेही वाचा – Covid Super Variant : दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा सुपर व्हेरिएंट, ३२ म्युटेशनमुळे वैज्ञानिकांमध्ये उडाली खळबळ


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -