नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या बातम्या सध्या सातत्याने चर्चेत आहेत. हाच मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही चांगलाच गाजला. हैदराबाद येथील एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला बांगलादेशातील हिंदूंसंदर्भात प्रश्न विचारला. (bangladesh hindu what government doing for jaishankar replied on owaisi question)
बांगलादेशातील हिंदूंवर जो अन्याय होतो आहे, त्यांना तिथे जे हिंसाचाराला तोंड द्यावे लागते आहे, त्यावर आपल्या सरकारने काय उपाययोजना केली आहे, असा प्रश्न ओवैसी यांनी सरकारला विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, या मुद्द्यावर आमचे लक्ष आहे.
हेही वाचा – Priyanka Gandhi : “निवडणुका बॅलेटवर झाल्यातर…”, ‘BJP’ उल्लेख करत प्रियांका गांधींचा मोठा दावा
बांगलादेशातील हिंदू तसेच अल्पसंख्याकांविरोधात होणाऱ्या अन्यायावर आमचे सरकार लक्ष ठेवून असल्याचे यावेळी जयशंकर म्हणाले. तेथील सरकारसोबत आम्ही याबाबत बोललो आहोत. भारताचे परराष्ट्र सचिव देखील नुकतेच बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. त्यांनी देखील तेथे जाऊन या मुद्द्यावर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
बांगलादेशासोबतच ओवैसी यांनी नेपाळ बाबतही संसदेत प्रश्न उपस्थित केला. नेपाळने आपल्या चलनी नोटांवर भारतीय भूभाग दाखवला आहे. यावर भारत सरकारची काय भूमिका आहे, अशी विचारणा त्यांनी केली. यावर एस. जयशंकर म्हणाले की, देशाच्या सीमांबाबत आमचे एकदम कडक धोरण आहे. आणि आम्ही आजही त्यावर ठाम आहोत.
कॉंग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी चीनच्या सीमेवरून असलेल्या वादाचा मुद्दा काढत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, एका आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या अहवालामध्ये म्हटल्यानुसार, सीमेवरून भारतीय सैन्य हटवल्यानंतर भारतीय सेना चौकीपर्यंत पोहोचू शकतात का, याबाबत विचारणा केली आहे. यावर उत्तर देताना एस. जयशंकर म्हणाले की, कोणी जर याबाबत काही लिहिले असेल तर त्याचे उत्तर ती व्यक्ती स्वतःच देऊ शकेल. मी केवळ सरकारकडून या गोष्टीचे स्पष्टीकरण देऊ शकतो. या संपूर्ण घटनेवर मी नुकतेच सविस्तर बोललो आहे. भारत आणि चीनमध्ये जो काही करार झाला आहे तो केवळ डेपसांग आणि डेमचौकशी संबंधित आहे. आपण जिथे गस्त घालत होतो, तिथे आपले लष्कर कधीही जाऊ शकत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Rahul Gandhi about Priyanka Gandhi : प्रियंका गांधींचे लोकसभेतील पहिले भाषण अन् राहुल गांधी म्हणाले…
Edited by : Ashwini A. Bhatavdekar