घरदेश-विदेशभारताच्या 'या' शेजारी देशात कांदा २७० रुपये किलो!

भारताच्या ‘या’ शेजारी देशात कांदा २७० रुपये किलो!

Subscribe

विमानाने कांद्याची आयात करावी लागत असल्याने कांद्याचे भाव कडाडल्याचे चित्र आहे.

कांद्याच्या वाढलेल्या किंमतीने भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महाराष्ट्रात कांदा प्रति किलो १०० रुपये दराने विकला जात आहे. कांद्याच्या वाढलेल्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. भारतात कांद्याची ही स्थिती असताना भारताचा शेजारी देश असलेल्या बांग्लादेशात मात्र कांदा प्रती किलो २७० रुपये दराने विकला जात आहे.

३० रुपयांवरुन २७० रुपयांवर कांद्याची किंमत

बांग्लादेशात आतापर्यंत ३० रुपये प्रतिकिलो मिळणाऱ्या कांद्याने २७० रुपये प्रतिकिलो दर गाठला आहे. बांग्लादेशला विमानाने कांदा आयात करावा लागत असल्याने दर वाढल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बांग्लादेशवासीयांच्या ताटातून कांदा हद्दपार झाला आहे.

- Advertisement -

भारतातील कांद्याने बांग्लादेशला रडवले

बांग्लादेशमधील कांद्याच्या वाढलेल्या दराला भारतातील कांदा कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. अवकाळी पाऊस, महापूर आदि कारणांमुळे भारतातील कांद्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी कांद्याचे उत्पादन घटले. यामुळे भारतातील कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

विमानाने कांद्याची आयात

कांद्याचे दर वाढल्याने सप्टेंबरपासून भारताने कांद्याची निर्यात बंद केली आहे. याचा फटका बांग्लादेशला बसला आहे. भारताकडून कांदा मिळत नसल्याने बांग्लादेशला विमानातून म्यानमार, तुर्की, चीन आणि मिस्त्रमधून कांदा आयात करावा लागत आहे.

- Advertisement -

सबसिडीच्या कांद्यासाठी रांगा

बांग्लादेशमध्ये कांद्याने २७०रुपये भाव गाठल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान बांग्लादेशात सरकारी संस्थान ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांग्लादेशने ४५ रुपये प्रति किलोने कांदा विकायला सुरूवात केली आहे. मात्र सबसिडीतून कांदा खरेदीसाठी नागरिकांना तासन् तास रांगेत उभं राहावं लागत आहे. वाढलेल्या दरामुळे हॉटेल मालकांनी आणि स्नॅक्स दुकानदारांनी कांद्याचा कमी वापर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -