ढाका : बांगलादेशातील इस्कॉनच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. यासोबतच खंडपीठाने बांगलादेश सरकारला देखाल फटकारले. बांगलादेशातील इस्कॉन प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेविरोधात हिंदू समाजाने निदर्शने केली. यावेळी सुरक्षा रक्षक आणि लोकांमध्ये झालेल्या भांडणात एका वकिलाचा मृत्यू देखील झाल्याचे समजते. (bangladesh iskcon high court refuses to ban iskcon in bangladesh government rebuked)
बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी अटक करण्यात आली. मंगळवारी न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार देत त्यांची तुरुंगात रवानगी केली. दरम्यान, शेख हसीना यांच्यानंतर बांगलादेशात नव्याने आलेले युनूस यांचे सरकार हिंदूंविरोधात होणारा हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले आहे.
हेही वाचा – Jasprit Bumrah : बुमराहच्या गोलंदाजीवर आक्षेप! आयसीसीचे नियम काय सांगतात?
बांगलादेशातील उच्च न्यायालयाने गुरुवारी इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार दिला. देशद्रोहाच्या आरोपांतर्गत बांगलादेश इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तेथे हिंदू समाजाने निदर्शने करण्यास सुरुवात केली. या असंतोषादरम्यान एका वकिलाचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्कॉनवरच बंदीची मागणी होऊ लागली होती.
या संघटनेशी संबंधित काही वृत्तपत्रांनी बुधवारी या घटनेबाबत लिहिल्यानंतर वकिलांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण चेतना समाज अर्थात इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. द डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, इस्कॉनच्या सध्याच्या हालचालींबाबत सरकारने काय पावले उचलली याची माहिती देण्यास उच्च न्यायालयाने ऍटर्नी जनरलला सांगितले होते. त्यानुसार अतिरिक्त ऍटर्नी जनरल आणि डेप्युटी ऍटर्नी जनरल यांनी न्या. फराह महबूब आणि न्या. देबाशीष रॉय चौधरी यांच्या खंडपीठासमोर माहिती ठेवली. वकिलाची हत्या आणि इस्कॉनच्या हालचाली या संदर्भात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणी 33 जणांना अटक करण्यात आली आहे.
या अहवालानंतर न्यायालयाने बांगलादेश सरकारला इशारा दिला आहे. देशातील कायदा – सुव्यवस्था टिकवण्यासोबतच बांगलादेशातील लोकांचे जीवन आणि संपत्तीचे सरकार रक्षण करेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
इस्कॉन चर्चेत का?
शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने अन्याय, अत्याचार होत आहेत. याच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनात इस्कॉनचे बांगलादेश प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांनी सहभाग घेतला. त्यामुळे देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.
हेही वाचा – Ambadas Danve on Congress : कॉंग्रेसचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडला; काय म्हणाले दानवे
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. तसेच ढाक्यातील हिंदू आणि अन्य सर्व अल्पसंख्याक समाजाचे संरक्षण करण्याचा आग्रह धरला आहे. (bangladesh iskcon high court refuses to ban iskcon in bangladesh government rebuked)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar