Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशS. Jaishankar : प्रत्येक गोष्टीसाठी भारतावर आरोप करणे हा मूर्खपणा, एस. जयशंकर यांनी बांगलादेशला खडसावले

S. Jaishankar : प्रत्येक गोष्टीसाठी भारतावर आरोप करणे हा मूर्खपणा, एस. जयशंकर यांनी बांगलादेशला खडसावले

Subscribe

बांगलादेशला भारतासोबत कशाप्रकारचे संबंध हवे आहेत, हे त्यांनी ठरवावे, अशा शब्दात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बांगलादेशला खडसावले आहे.

S. Jaishankar on Banglades Relations : नवी दिल्ली : बांगलादेशकडून सातत्याने होणारे आरोप पाहता भारत सरकार आता बांगलादेशविरोधात थेट भूमिका घेताना दिसते आहे. बांगलादेशला भारतासोबत कशाप्रकारचे संबंध हवे आहेत, हे त्यांनी ठरवावे, अशा शब्दात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बांगलादेशला खडसावले आहे. मस्कत येथे बांगलादेशी परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर जयशंकर यांचे हे विधान समोर आले आहे. या बैठकीत त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचा मुद्दा देखील चर्चेला आणला. (bangladesh should tell us what kind of relationship it wants with us jaishankar sought an answer)

प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जयशंकर म्हणाले की, बांगलादेशातील प्रत्येक गोष्टीसाठी तेथील हंगामी सरकारमधील कोणी न कोणी दररोज भारताला जबाबदार धरेल तर हा मूर्खपणा आहे. एका बाजूला तुम्ही भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करू इच्छिता पण दुसरीकडे तुम्ही दररोज सकाळी प्रत्येक गोष्टीसाठी भारतालाच जबाबदार धरता. तर अशा गोष्टी तुम्ही करू शकत नाही. एक ठाम भूमिका तुम्हाला घ्यावीच लागेल, असेही जयशंकर म्हणाले.

हेही वाचा – Thackeray vs Modi : मोदींना कोणाचे भय वाटले? उद्धव ठाकरे यांचा प्रश्न

अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचा मुद्दा देखील त्यांनी या चर्चेत आणला. बांगलादेशात सातत्याने अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे स्वाभाविकपणे आमच्या विचारसरणीवर परिणाम करतात. याबाबत चर्चा करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि आम्ही याबाबत सातत्याने बोलतो आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते राजकारण करत आहेत. मात्र, ते फार उपयोगाचे नाही. कारण, शेवटी हे दोन्ही देश परस्परांचे शेजारी आहेत.

त्यामुळेच भारतासोबत कशाप्रकारचे संबंध ठेवायचे हे त्यांना ठरवावेच लागेल. कारण, बांगलादेशसोबत आमचे जुने नाते आहे. 1971 पासूनचे आमचे त्यांच्यासोबत संबंध आहेत.

हेही वाचा – Weather Update : मुंबईसह राज्यातील 5 जिल्ह्यांना IMD चा इशारा, पुढील 3 दिवस असे असेल तापमान

जयशंकर यांनी ही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायसवाल यांनी देखील यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली होती. बांगलादेशातील हंगामी सरकारच्या सल्लागारांकडून सातत्याने होणाऱ्या भारतविरोधी टिप्पण्या यामुळे भारत आणि बांगलादेशच्या संबंधांवर काही परिणाम होईल का, अशी विचारणा जायसवाल यांना करण्यात आली होती. त्यावर त्यांनी आमचे अशा सगळ्या प्रतिक्रियांवर लक्ष असल्याचे सांगितले.