घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोनावर प्रभावी औषध संयोजन सापडलं; बांग्लादेशी डॉक्टरांचा दावा

कोरोनावर प्रभावी औषध संयोजन सापडलं; बांग्लादेशी डॉक्टरांचा दावा

Subscribe

कोरोनाच्या रुग्णांना बरं करण्यासाठी प्रभावी औषध संयोजन सापडलं, असा दावा बांग्लादेशी डॉक्टरांनी केला आहे. या औषधावर आमचा १०० टक्के विश्वास आहे, असं डॉक्टर तारिक आलम म्हणाले.

संपूर्ण जगाचे कोरोना विषाणूच्या लसीकडे डोळे लागले आहेत. दरम्यान, बांगलादेशातील डॉक्टरांनी कोरोना विषाणूचे औषध सापडल्याचा दावा केला आहे. बांगलादेशमधील एका वरिष्ठ डॉक्टर्सच्या नेतृत्वात वैद्यकीय पथकाने असा दावा केला आहे की कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी त्यांना एक प्रभावी औषधांचं संयोजन (Combination) सापडलं आहे. दोन मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या संयोजनाने तयार केलेल्या प्रतिरोधक औषधामुळे कोरोनाचे रूग्ण बरे झाले, असा दावा बांगलादेशी वैद्यकीय पथकाने केला आहे. बांगलादेशी वैद्यकीय पथकामध्ये देशातील नामांकित डॉक्टरांचा समावेश आहे.

बांगलादेश मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (बीएमएचसी) मधील औषध विभागाचे मुख्य प्राध्यापक डॉ. एमडी तारिक आलम यांनी सांगितलं की कोरोनाच्या ६० रूग्णांवर औषधाची चाचणी करण्यात आली आहे आणि ते बरे झाले आहेत. ते म्हणाले की या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तारिक आलम म्हणाले की अँटीप्रोटोझोल औषध रुग्णांना अँटीबायोटिक डॉक्सीसाइक्लिन औषधासह देण्यात आलं. ज्याचा निकाल खूप चांगला आहे. माझी टीम कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी फक्त दोन औषधे लिहून देत आहे. पुढे ते म्हणाले, सुरुवातीला आम्ही रुग्णांची चाचणी करतो. जर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याला हे औषध देतो. अनेक रुग्ण हे औषध घेतल्यानंतर चार दिवसातच बरे झाले आहेत. या औषधावर आमचा १०० टक्के विश्वास आहे, असं देखील डॉक्टर तारिक आलम म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रासह ‘या’ तीन राज्यातून येणाऱ्या लोकांना कर्नाटकमध्ये प्रवेश नाही


डॉक्टर तारिक आलम यांनी सांगितलं की त्यांनी संबंधित सरकारी नियामकांकडे संपर्क साधला आहे आणि कोविड-१९ च्या उपचारासाठी औषध मंजूर करण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय प्रक्रियांशी संबंधित काम करत आहेत. तारिक आलम म्हणाले की त्यांची टीम आंतरराष्ट्रीय जर्नलसाठी औषधाच्या विकासासाठी एक पेपर तयार करीत आहे जी वैज्ञानिक समीक्षा आणि मान्यता यासाठी आवश्यक आहे.

- Advertisement -

दरम्यान, तारिक आलमचे सहकारी डॉक्टर रबिउल मुर्शीद म्हणाले की कोविड-१९ रुग्णालय असूनही मोठ्या संख्येने रुग्ण थेट आणि अप्रत्यक्षपणे बीएमसीएच येथे येत आहेत. ते म्हणाले की कोरोनाचे रुग्ण चार दिवसात बरे होतात आणि तीन दिवसांत त्यांची लक्षणे ५० टक्क्यांनी कमी होत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -